मुंबई : वडील आणि मुलीचं नाते हे जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ नातं आहे. प्रत्येक बापासाठी आपली मुलगी एका राजकुमारीपेक्षा कमी नसते. प्रत्येक बाप आपल्या मुलीची सगळी स्वप्न आणि मागणी पूर्ण करत असतो. तो आपल्या मुलीसाठी काहीही करण्याची तयारी दाखवतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका मुलीचं आपल्या वडीलांसोबतचं नातं किती घट्ट आणि प्रेमळ आहे हे आपल्याला दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी आपल्या वडिलांच्या ओठांवर लिपस्टिक लावताना दिसत आहे. या क्यूट व्हिडीओने हजारो लोकांची मनं जिंकली आहेत. या मुलीचे वडील हे एक आयपीएस अधिकारी आहेत आणि त्यांनी स्वत: त्यांच्या मुलीसोबतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आयपीएस अधिकारी विजयकुमार हे तामिळनाडू पोलिस विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेत एसपी आहेत.


व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विजयकुमार यांची मुलगी त्यांच्या ओठांवर लिपस्टिक लावताना दिसत आहे. तिच्या जवळच इतर अनेक मेक-अप वस्तू आहेत, ज्या तिला तिच्या वडिलांसाठी वापरायच्या आहेत आणि त्यांचा मेकअप देखील तिला करायचा आहे.


आयपीएस अधिकाऱ्यांनी हा व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले, "मुली/मुलं जगात सर्व सुख घेऊन येतात. माझी मुलगी नीला माझ्यासोबत आहे."



हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 2 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. मुलगी आणि वडीलांचा हा क्यूट व्हिडीओ पाहून लोकांना देखील फार चांगलं वाटत आहे आणि ते हा व्हिडीओ आपल्या मित्रांसोबत शेअर करत आहेत.


लोकांकडून सुंदर प्रतिक्रिया देखील या व्हिडीओवर येत आहेत. एका यूजरने लिहिले - 'नीला खूप क्यूट आहे आणि दोघांमधील संभाषण किती छान आहे.' आणखी एका युजरने म्हटले की, 'आयपीएस अधिकाऱ्याला लिपस्टिक लावण्याचे धाडस फक्त त्यांच्या मुलींमध्येच असते.'