कोर्ट परिसरात महिला - पुरुष वकीलांमध्ये दे दणादण, लाथा-बुक्क्या मारतानाचा Video Viral
Lawyers Fighting Video : आरोपीला शिक्षा व्हायला पाहिजे की नाही यासाठी दोन वकील कोर्टात एकमेकांशी शाब्दिक लढाई करतात. पण महिला पुरुष वकीलांच्या हाणामारीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Fight in Rohini Court Delhi Video : सोशल मीडिया हा अनेक व्हिडीओंचा खजिना आहे. यात तुम्हाला मनोरंजक व्हिडीओ पाहून हृदयाचे ठोके चुकविणारे असंख्य व्हिडीओ पाहिला मिळतात. काही व्हिडीओ तर इतके मजेदार असतात की ते पाहून क्षणात आपण दिवसभराचा ताण विसरून हसायला लागतो. पण सध्या एका व्हिडीओने नेटकऱ्यांना विचार करण्यास भाग पाडलं आहे. असं म्हणात डॉक्टर आणि वकीलापासून काही लपवायचं नसतं. ते आपल्या मदतीसाठी असता.
एखादी व्यक्ती ही आरोपी आहे की नाही यासाठी कोर्टात दोन वकील एकमेकांशी शाब्दिक लढाई लढतात. दोन वकीलांमधील ही लढाई एकदम प्रोफोशनल असते. कोर्टाच्या बाहेर ते एकमेकांचे मित्र असतात. पण जर दोन वकीलचं एकमेकाशी मारामारी करताना दिसले तर...(viral video Lawyers Fighting in Delhi Rohini Court trending video on Social media Watch now)
दे दणादण!
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिल्लीतील रोहिणी कोर्ट परिसरात पुरुष - महिला वकीलांमध्ये जोरदार हाणामारी सुरु असल्याचं दिसतं आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, 'त्याने मला घट्ट पकडलं त्यामुळे मी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करु लागली. पण पुरुष वकीलाने तिला सतत मारहाण केली. या मारहाणीत तिच्या चेहऱ्यावर आणि शरीराच्या इतर भागांवर गंभीर जखमा झाल्याचं तिचं म्हणं आहे. तुम्ही पाहू शकता या व्हिडीओमध्ये काही कोर्ट परिसरातील काही लोक त्यांना सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत.
पुरुष वकीलाविरोधात तक्रार दाखल
मिळालेल्या माहितीनुसार महिला वकीलाने पुरुष वकीलावर गंभीर आरोप केले आहेत. त्याशिवाय तिने त्या वकीलाविरोधात पोलीस उपायुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. 18 मे 2023 ला पीडित महिला रोहिणी कोर्ट क्रमांक-113 समोर उभी असताना हा धक्कादायक प्रकार घडला. विष्णू कुमार शर्मा असं या पुरुष वकिलाचं नाव आहे. अचानक तिथे विष्णुकुमार शर्मा आले आणि त्यांनी भांडण करण्यास सुरुवात केली, असं पीडित वकीलाचं म्हणं आहे. शांतपणे उभ्या असताना विष्णुकुमार महिलेवर हल्ला करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
पोलिसांकडून व्हिडीओची दखल
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनीही या घटनेची नोंद घेतली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून जो कोणी दोषी असेल त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटर Ghar Ke Kalesh या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आल ा आहे.
कोर्टा परिसरात अशा प्रकारच्या घटनेचा हा पहिला व्हिडिओ नाही. याआधीही न्यायालय परिसरातून असे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वी कोर्टा परिसरात गोळीबार करण्यात आल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता.