Trending Viral Video : सहसा एखाद्या कार्यक्रमासाठी मंत्रीमहोदयांची हजेरी असेल तर तिथं काय होतं? भाषणं, टाळ्या, गर्दी आणि बरंच काही. पण, सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओतून त्यापलीकडेही काय होऊ शकतं हेच पाहायला मिळत आहे. जिथं मंत्री बेजार होऊन असं काहीतरी करु लागले की उपस्थित जनता त्यांच्याकडे विचित्र नजरेनं पाहू लागली. सोशल मीडियावर (Social Media) सध्या हा व्हिडीओ प्रचंड शेअर होताना दिसत आहेत. 


व्हिडीओमध्ये असणारे मंत्री आहेत तरी कोण? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये (Madhya Pradesh) मध्यप्रदेश सरकारमधील राज्यमंत्री बृजेश सिंह यादव दिसत आहेत. जिथं ते अंगावरील कपडे काढताना दिसत आहेत. विचित्र विचार करु नका, त्यांनी सदरा काढण्याचं कारण म्हणजे अचानकच त्यांच्या शरीवर अचानकच आलेली खाज. (Viral Video Madhya Pradesh Minister Brijendra Singh Yadav took bath in onging event because of Itching On Stage)


हेसुद्धा वाचा : Pradnya Rajeev Satav: राजीव सातव यांच्या पत्नीवर गंभीर हल्ला, जीवाला धोका म्हणत दिली माहिती 



यादव त्यांच्या मतदार संघात विकास यात्रेच्या निमित्तानं गेले होते. यावेळी अशोकनगर येथे कुणीतरी स्वागत करताना मंत्र्यांवर खाजखुजलीची पावडर लावली. बस्स! मग काय? पुढच्याच क्षणापासून ते खाज येत असल्यामुळं हैराण झाले. इतके की सुरु कार्यक्रमातून निघत त्यांनी गावात उघड्यावरच अंगावरचे कपडे काढत अंगावर पाणी घेतलं. तेव्हा कुठे त्यांना होणारा त्रास कमी झाला. बरं हे सर्व सुरु असताना अनेकांचेच कॅमेरे सुरु राहिले आणि काही तासांतच हा झाला प्रकार सोशल मीडियावर संपूर्ण देशानं पाहिला. 


मंत्रीमहोदय बेजार... 


व्हायरल होणारा हा व्हिडीओ देवरछी गावातील असल्याचं सांगण्यात येत आहे. जिथं यादव यांच्या विकास यात्रेदरम्यान भजन संध्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आली होतं. याच कार्यक्रमादरम्यान कुणीतरी मंत्र्यांवर ही पावडर लावली ज्यामुळं संपूर्ण शरीरावर खाज येण्यास सुरुवात झाली. इतकी की मंत्र्यांना कपडेही उतरवावे लागले. या प्रसंगी काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लगेचच यादव यांची मदत तरत त्यांना साबणानं हात धुण्यासाठी मदत केली. 


नेतेमंडळी अनेकदा फसतात, फजितीचा विषय बनतात. पण, यादव यांच्या या व्हिडीओवरून सध्या बऱ्याच चर्चा आणि विनोद सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे त्यांना ही पावडर लावली कुणी आणि असं करण्यामागे नेमकं कारण काय? हा प्रश्नही उपस्थित होत आहे.