मुंबई : सोशल मीडिया हा आपल्यासाठी करमणुकीचा खजीना आहे काही, केव्हा ही ते उघडलं की, आपल्याला त्यावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात, ज्यामुळे आपले मनोरंजन होते. काही लोक खूप धाडसी असतात आणि कोणत्याही प्रकारचे आव्हान स्वीकारण्यास घाबरत नाहीत. त्यामुळे असे लोक आपल्या जिवाची पर्वा न करता प्रसिद्धीसाठी कोणत्याही प्रकारचे स्टंट करायला तयार असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असाच व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे, ज्यात काही मित्र एकमेकांना  चॅलेंज देत आहेत. आपण सोशल मीडियावर खाण्या-पिण्याच्या चॅलेंजपासून ते डान्सच्या स्टंटपर्यंत सगळे व्हिडीओ पाहिले असेल. परंतु या व्हिडीओमधील स्टंट हा काहीसा वेगळा आहे. कारण हा बाईक स्टंट (Bike Stunt Video) आहे. ज्यामध्ये बाईकस्वाराला एका कमकुवत आणि डगमगत्या पुलावरुन बाईक घेऊन जायचे आहे.


दिलेलं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी, बाईक चालवणारी व्यक्ती बाईक सुरू करतो आणि ताबडतोब त्याच्या मिशनवर सुरू होते. तो चॅलेंज पूर्ण करताना त्याला कल्पना नव्हती की, पुढे त्याच्यासोबत काय घडणार आहे. नाही तर त्याने हे चॅलेंज कधीही स्वीकारले नसते.


व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, तो काही अंतर कसं तरी तोल सावरत पार करतो परंतु, पुलाच्या दुसऱ्या टोकाला तो पोहोचणार त्यापूर्वाच त्याचा तोल जातो आणि तो बाईक सोबत त्या पुलावरुन खाली पडतो.



आतापर्यंत 14 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हायरल व्हिडीओ पाहिला आहे. बहुतेक लोक या व्यक्तीची थट्टा करत आहेत. तसेच पैशांसाठी कोणीही काहीही करायला तयार होऊ नये असा सल्ला देखील लोक देत आहे.