Viral Stunt Video:  रस्त्याचा एक बाजूहून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी रस्त्यावर पादचारी पुल बांधणात आलं आहेत. या पुलांवर अनेक वेळा प्रेमी युगुलांचा आणि गर्दुल्ल्याचा धुमाकूळ दिसतो. पादचाऱ्यांचा सोयीसाठी करण्यात आलेले हे ब्रीज  गुन्हेगारीचे छोटंखानी जग असतं.सध्या सोशल मीडियावर याच पुलाचा एक व्हिडीओ नेटकऱ्यांना विचार करायला लावत आहे. कारण व्यक्ती या पुलावर स्टंट करताना दिसतं आहे. जीवाची पर्वा न करता तो व्यक्ती पुलावरुन नाही तर पुलाच्या छतावर सायकल चालवताना दिसत आहे. हे दृश्य पाहून आजूबाजूला असणाऱ्या लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 


हा डोक्यावर पडला आहे का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही महाशयांना जीवघेणे स्टंट करायला खूप आवडतं. सुसाट बाइकवर हात सोडून देणं, उभं राहणं, उंच डोंगरावरुन दोरी लावून उडी मारणं, असं अनेक धक्कादायक स्टंट करतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला मिळतात. सोशल मीडियावर स्टंट करुन प्रसिद्ध मिळवण्याचा हा एक मार्ग आहे. असाच एक स्टंटबाज कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या माणसाने चक्क फुटओव्हर ब्रिजच्या छतावर सायकल चालवली. हा व्हिडीओ पाहून प्रत्येक जण आश्चर्यचकित होत आहे. (viral video man riding cycle on roof of overbridge danger Stunt Trending Video trend on google )


हा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणत आहेत, हा डोक्यावर पडला आहे का? शिवाय या व्यक्तीने छतावर सायकल नेली तरी कशी? आता तो सायकल घेऊन उतरणार कसा? असे अनेक प्रश्न हा व्हिडीओ पाहून पडतात. सूर्य आग ओकत असताना भर उन्हात आणि पुलावरुन लोकांची ये जा सुरु असताना या माणसाचा प्रताप सगळ्यांना बुचकळ्यात पाडतोय. अंगावर फार कपडे नसून हा व्यक्ती हा स्टंट करताना दिसत आहे. पुलाच्या एका बाजूने त्याने सायकल चालवायला सुरुवात केली आणि तो पुलाच्या दुसऱ्या बाजूला गेला. तिथून यू डर्न घेत तो परत आला. 


हा व्हिडीओ  2_x_santosh__m__0004 या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना कर्नाटकातील भीमपूर या गावातील आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


या व्हिडीओला शेअर करण्यापासून आतापर्यंत 7 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. मृत्यूचा हा थरार नशिब यमाने पाहिला नाही. यमराज झोपले असावे म्हणून तो माणून जीवघेणा स्टंट करुनही जिवंत आहे.