मुंबई : जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना स्टंट करायल किंवा धोका स्वीकारायला आवडते. आपण सोशल मीडियावरती नेहमीच असे काही व्हिडीओ पाहत असतो, काही व्हिडीओ पाहून आपले मनोरंजन होते तर काही व्हिडीओ असे असतात ज्यावर आपल्याला विश्वास ठेवणे देखील कठीण होऊन बसते. तर काही व्हिडीओ आपल्या हृदयाचे ठोके चूकवतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्ही स्तब्ध उभे राहाल आणि तुम्हाला काहीही सुचणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही लोकं फक्त एका दोरीच्या सहाय्याने दरीच्यामध्य भागी आपले स्टंट दाखवत आहेत. यात विशेष गोष्ट अशी की या दोरी व्यतीरिक्त या लोकांना कशाचाच आधार नाही म्हणजे जर या लोकांकडून एक छोटी जरी चूक घडली, तरी सगळं संपलं, त्यामुळे या स्टंट दाखवणाऱ्यांना चूक करण्याची कोणतीही संधी नाही.


तसेच या खोल दरीच्या मध्यभागी या दोरीवर एक दुचाकीस्वार वेगाने दुचाकी चालवत आहे. जिथे फक्त दोरीवर उभे राहाणे कठीण आहे त्या दोरीवर हा व्यक्ती दुचाकी चावलत आहे. परंतु या सर्वात आणखी आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे जेव्हा तो दुचाकीस्वार दुचाकी चालवत असतो तेव्हा तो सीटवर उभा राहतो. हे पाहिल्यानंतर मात्र तुमच्या हृदयाचा ठोका नक्कीच चुकेल. जितके श्वास रोखून हे स्टंट करत आहेत, तितकाच श्वास रोखून लोकं हा व्हिडीओ पाहत आहे.


व्हिडीओ पाहून असे दिसते की, एखाद्या उत्सवाच्यादरम्यान एका खोल डोंगराच्या मध्यभागी प्रोफेश्नल्सकडून असे धोकादायक आणि प्राणघातक स्टंट केले जात आहे. 2 मिनिट 20 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये असे दिसते की, दोन डोंगरांच्यादरम्यान एक लोखंडी तार बांधलेली आहे आणि काही लोक या वायरवर स्टंट करताना दिसत आहेत.


प्रथम दोन माणसे त्यांच्या सायकलच्या साहाय्याने याच्या मध्यभागी जातात आणि थांबतात आणि नंतर काही सेकंदांनंतर एक व्यक्ती दुचाकीने मागून येते आणि सायकल ढकलते.


सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे दुचाकीसह त्या व्यक्तीसोबत आणखी एक माणूस खाली लटकलेला आहे. स्टंट करणारी व्यक्ती आपल्या बाईकच्या सीटवर हवेत उभी राहते आणि नंतर वेगाने गाडी चालवते. त्याला बघून असे वाटते की, त्याला त्याच्या जीवाची अजिबात काळजी नाही. व्हिडीओ पाहिल्यानंतर असे वाटेल की, हे सर्व सर्कस तज्ञ आहेत, जे या खोल दरीत इतक्या निर्भयपणे पराक्रम करत आहेत.



हा व्हिडीओ नक्की कुठला आहे हे काही समोर आलेलं नाही. परंतु हा व्हिडीओ ट्विटरवर IAS अधिकारी रुपिन शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, 'मंत्रमुग्ध .. नक्की पहा.'