मेरठ : मेरठमध्ये मेडिकल कॉलेजच्या बीए नर्सिंगच्या दोन विभिन्न धर्माच्या विद्यार्थी-विद्यार्थींनी एकत्र दिसल्यावरून विश्व हिंदू परिषदेनं जोरदार राडा घातला. त्यांनी या विद्यार्थ्यांना मारहाणही केली. या राड्यानंतर सोशल मीडियावर आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओत जनतेच्या संरक्षणाची असलेले पोलीसच कायदा आपल्या हातात घेताना दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मेरठ पोलिसांवर सर्व स्तरांतून टीका होतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडिओमध्ये एक महिला पोलीस विद्यार्थीनीला पोलिसांच्या जीपमध्ये मारहाण करताना दिसत आहे... तर हा व्हिडिओ गाडीत पुढच्या सीटवर बसलेला एक पोलीस आपल्या मोबाईल कॅमेऱ्यातून शूट करताना दिसत आहे. 


या व्हिडिओत पोलीस विद्यार्थीनीला दुसऱ्या धर्माच्या मित्राबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करताना दिसत आहेत. इतकंच नाही तर पोलिसांनी जबरदस्तीनं या विद्यार्थीनीचा चेहराही सार्वजनिक केलाय. 



गाडी चालवताना व्हिडिओ शूट करणारा पोलीस तरुणीशी असभ्य भाषेत बोलताना दिसतोय... तर भेदरलेली तरुणी मात्र माफी मागताना दिसतेय. 


हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर अडचणीत आलेल्या पोलीस विभागानं मंगळवारी एका महिला कॉन्स्टेबलसहीत तीन पोलिसांना निलंबित केलंय.