नवी दिल्ली: बऱ्याचदा आपण फिरायला गेल्यावर किंवा प्राणी संग्रहालयातही प्राण्यांना खायला देतो. प्राण्यांना खायला देऊ नये असं सांगितलं असतानाही बऱ्याचदा असे प्रकार पर्यटक करतात. प्राण्यांना दगड मारणे, खेळण्यासाठी प्रवृत्त करणं आणि खायला घालणं असे प्रकार केले जातात. एका पर्यटकाला व्हिडीओ काढण्यासाठी माकडाला खाऊ घालणं महागात पडलं आहे. या पर्यटकाला माकडानेच चांगली अद्दल घडवली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पर्यटक एका माकडाच्या पिल्लाला केळ खायला देत आहे. या माकडाच्या पिल्लाला केळं खायचा मूड असल्याचं दिसत नाही. मात्र तरीही जबरदस्तीने पर्यटक त्याला खाऊ घालण्याचा प्रयत्न करत होता. संयम सुटल्याने अखेर या माकडाने पर्यटकाला अद्दल घडवली. ही अद्दल कदाचित पर्यटक यानंतर कधीही विसरू शकणार नाही. 


वैतागलेल्या माकडाने पर्यटकाच्या थेट कानशिलात लगावली. पर्यटकाच्या हातून फोन खाली पडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी तुफान कमेंट्स केल्या आहेत. 63 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर हजारहून अधिक लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. 


अशा प्रकारची प्राण्यांसोबतची मस्ती अंगाशी येऊ शकते. या पर्यटकाची मस्ती या माकडाने चांगलीच जिरवली आहे. अशा प्रकारे प्राण्यांना त्रास दिल्यावर काय होऊ शकत ते हा व्हिडीओ पाहून लक्षात येऊ शकतं. 




सूचना- हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. झी 24 तास या व्हिडीओची कोणतीही पुष्टी करत नाही.