Mother Daughter Video Viral : देशभरात साखळी चोऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरा शहरात बाइकवरुन येऊन महिलांना गाठून त्यांची साखळी, पर्स आणि मोबाईल चोऱ्यांनी धुमाकूळ घातला आहे. अशा घटनांमध्ये अनेक महिला या जखमी झाल्या आहेत. अचानक धानीमनी नसताना हे चोर हल्ला करतात त्यामुळे त्यांना पकडणं कठीण होतं. अशाच एका साखळी चोऱ्यांचा करनामा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. (viral video Mother Daughter duo captures chain snatcher what happens next trending video on social media google trend now)


अन् आई आणि मुलीने त्यांना 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका शहरातील गल्लीमध्ये सायकल रिक्षामधून आई आणि अल्पवयीन मुलगी उतरतात. रस्त्यावरून गाड्यांची आणि लोकांची येजा सुरु आहे. रिक्षेवाल्याला पैसे दिल्यानंतर त्या दोघी रस्ता ओलांडणारच तेवढ्यात बाइकवरुन हेल्मेट घातलेले दोन तरुण त्या महिलेसमोर येऊन थांबता आणि बाइकवर मागे बसलेल्या एक तरुण तिच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचतो अन् मग...


धाडस आहे मायलेकीचं...


अचानक झालेल्या हल्ल्यामुळे त्या दोघे काही सेकंदसाठी बिथरल्या पण त्या दोघींनी बाइकवरील मागील तरुणाला धरलं त्यामुळे दोघे बाइकस्वार खाली पडले. त्या दोघींनी ज्या प्रकारे त्या चोराला पकडलं होतं त्यामुळे दुसरा चोराने तेथून पबारा केला. त्या तरुणाने निसटण्यासाठी खूप प्रयत्न केला पण त्या मायलेकीने त्याला घट्ट धरलं होतं. 


हे पाहून परिसरातील इतर लोक त्यांचा मदतीला पाहून ताबडतोब धावत आली आणि त्या चोराला दे दणादण मारायला लागली. मात्र त्यातील बाइकस्वार फरार होण्यास यशस्वी झाला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.



हा व्हिडीओ ट्वीटरवर @Arhantt_pvt या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओ पाहून या मायलेकीच्या धाडसाचं कौतुक होतं आहे.