कोईंबतूर : सोशल मीडियावर प्राण्यांचे व्हिडीओ काही कमी नाहीत. अगदी शिकार करतानाच्या थरारत व्हिडीओपासून एखादा प्राणी त्याच्या पिल्लाला जन्म देतानाचा व्हिडीओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो. मुळात प्राण्यांच्या व्हिडीओंनाच कमाल लोकप्रियता मिळताना दिसते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिथं सक्षम शरीर आणि सक्रिय मेंदू दिलेला असतानाही मनुष्य प्रजाती वाट चुकताना दिसते तिथेच हे प्राणी माणसाला तुम्ही बुद्धिनं आणि विचारानंही किती मागे आहात हेच जणू त्यांच्या प्रत्येक कृतीतून सांगताना दिसतात. 


मनुष्याला आरसा दाखवणाऱ्या याच प्राण्यांपैकी अनेकांच्याच आवडीच्या प्राण्यांचा Video सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही महाकाय हत्ती रस्त्यावरून चालत येताना दिसत आहेत. (Viral video of a baby elephant being escorted with senior members read details)


अतिशय शांततेच चालत येतानाच या हत्तींच्या मधूनच एक इवलासा हत्तीसुद्धा पुढे येताना दिसतो. भर रस्त्यातून जात असताना आपल्यातील या लहानग्याला अतिशय सावधगिरीनं आणि सुरक्षितरित्या अपेक्षित स्थळी नेण्यासाठीचाच त्यांचा हा प्रयत्न. 


छोट्या हत्तीला मिळालेल्या या Z+++ सिक्युरिटीचा अनोखा व्हिडीओ सत्यमानगलम कोईंबतूर रस्त्यावरील असल्याचं सांगण्यात येत आहे. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 



सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करताच त्यावर अनेकांनीच कमेंट करत आणि रिअॅक्ट होत या व्हिडीओला भरभरून प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळत आहे. 


राजकीय वर्तुळातील त्याचत्याच घटना आणि डावपेचांच्या बातम्यांमध्ये व्हायरल होणारा हा व्हिडीओ आजच्या दिवसातील सर्वात बेस्ट व्हिडीओ आहे, असं म्हणायला हरकत नाही.