Viral Video: सोशल मीडिया (Social Media) म्हटलं की रोज नवे फोटो, व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. असाच एक अपघाताचा (Accident) व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीस्वाराने मागून कारला धडक दिल्यानंतर आधी तो कारच्या टपावर आणि नंतर काचेवर येऊन आदळला. याची तीव्रता इतकी होती की, कारची पुढील काच पूर्ण फुटते आणि दुचाकीस्वार त्यातून आत जातो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर यामध्ये नेमकी चूक कोणाची अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. 


व्हिडीओत नेमकं काय? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल झालेल्या या व्हिडीओ रस्त्यावरुन नियमितप्रमाणे वाहनं धावत असताना दिसत आहे. याचवेळी लाल रंगाची एक गाडी येते आणि झेब्रा क्रॉसिंगच्या आधी अचानक थांबते. समोरुन कुत्रा जात असल्याने महिला चालकाने करकचून ब्रेक दाबला असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. मात्र महिलेने अचानक कार थांबवेल याची कोणतीही कल्पना मागून वेगात येणाऱ्या दुचाकीस्वाराला नसते. 


दुचाकीस्वार लेन क्रॉस करुन दुसऱ्या बाजूने वेगात येत असतानाच अचानक कार थांबल्याने तो मागून जोरदार धडक देतो. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीस्वार उलटा होऊन कारच्या टपावर कोसळतो. यानंतर तो कारच्या पुढील काचेवर जाऊन आदळतो. हा प्रहार इतका होता की, काच फुटते आणि दुचाकीस्वार त्यातून कारच्या आत जातो. काही वेळाने दुचाकीस्वार स्वत:ला सावरत कारवरुन खाली उतरतो. यावेळी त्याला बसलेला अपघाताचा धक्काही जाणवत आहे.



दरम्यान दुचाकीस्वाराने धडक देताना मागून येणारी कार तिथेच थांबते. तर रस्त्यावरुन तो कुत्रा पुढे पळत निघून जातो. 


हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रस्त्यावर अचानक आलेल्या श्वानाची, श्वानासाठी गाडी थांबवणाऱ्या महिलेची की, वेगात निघालेल्या दुचाकीस्वाराची चूक आहे यावर चर्चा सुरु आहे. महिलेने अचानक ब्रेक न दाबता गाडी थांबवत असल्याचा इशारा द्यायला हवा होता असं काहींचं म्हणणं आहे. तर काहींनी दुचाकीस्वार फारच वेगात होता असं म्हटलं आहे. आता हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला काय वाटतं?