Viral Video: बैलाने 4 वर्षाच्या मुलाला आधी शिंगाने उडवलं आणि नंतर..., अंगावर काटा आणणारा Video व्हायरल
Viral Video: हैदराबादमध्ये (Hyderabad) एका चिमुरड्याला भटक्या कुत्र्यांनी (Stray Dog) हल्ला करत ठार केल्यानंतर अशीच साधर्म्य असणारी एक घटना समोर आली आहे. अलिगड (Aligarh) येथे एका 4 वर्षाच्या मुलाला बैलाने (Bull) अक्षरश: चिरडलं आहे. ही धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Viral Video: हैदराबादमध्ये (Hyderabad) काही दिवसांपूर्वी भटक्या कुत्र्यांनी एका चिमुरड्यावर हल्ला करत त्याला ठार केलं होतं. या घटनेनंतर पुन्हा एकदा भटके कुत्रे आणि प्राण्यांचा मुद्दा चर्चेत आला होता. दरम्यान अलिगडमध्ये (Aligarh) पुन्हा एकदा याच्याशी साधर्म्य असणारी घटना घडली आहे. भटक्या बैलाने (Stray Bull) एका चार वर्षाच्या मुलाला अक्षरश: चिरडलं असून त्याला गंभीर जखमी केलं आहे. ही घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे.
अलिगडमध्ये 4 वर्षांचा मुलगा भटक्या बैलाच्या हल्ल्यात जखमी झाला आहे. मुलगा गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या हल्ल्याचं सीसीटीव्ही पाहिल्यानंतर तुमच्याही अंगावर काटा येईल.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत मुलगा रस्त्यावर उभा असल्याचं दिसत आहे. मुलगा रस्त्यावर एकटाच उभा असताना अचानक बैल तिथे येतो. बैल आपल्यावर हल्ला करेल याची चिमुरड्याला काहीच कल्पना असते. काही सेकंदात बैल मुलाला अक्षरश: हवेत उडवतो. त्यानंतर बैल त्या मुलाच्या अंगावर जाऊन बसतो.
मुलाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून एक व्यक्ती बाहेर पळत येतो. हा व्यक्ती त्याचा वडील असावा असं दिसत आहे. यानंतर तो व्यक्ती मुलाला बैलाच्या तावडीतून सोडवतो.
घटनेची माहिती मिळताच पालिका अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. या भटक्या बैलाला पकडण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. दरम्यान या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण आहे. भटक्या बैलांचा बंदोबस्त केला जावा अशी मागणी स्थानिक करत आहेत. दरम्यान, मुलगा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.