Bus Accident: केरळमध्ये (Kerala) बस आणि कारमध्ये जोरदार धडक होऊन भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात एकूण 15 प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाला आहे. Pathanamthitta जिल्ह्यात हा अपघात झाला आहे. दरम्यान, या अपघाताचं सीसीटीव्ही सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालं आहे. हे सीसीटीव्ही पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. 


नेमकं काय झालं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीसीटीव्हीत दिसत आहे त्याप्रमाणे, मोकळ्या रस्त्यावरुन वाहनांची ये-जा सुरु होती. यावेळी एक बस वेगाने येते आणि लेन सोडून समोरच्या कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करते. दरम्यान वळण असल्याने समोरुन येणाऱ्या कारचालकाला याची कल्पना नसते. त्यामुळे बसचालक  अपघात टाळण्यासाठी आपल्या लेनमध्ये जाणार इतक्यात कार आणि बसची धडक होते. बस इतकी वेगात असते की कारला धडक दिल्यानंतर ती रस्ता सोडते आणि शेजारी असणाऱ्या चर्चच्या भिंतीवर जाऊन आदळते. बसने धडक दिल्यानंचर चर्चची पूर्ण सुरक्षाभिंत तिच्यावर कोसळते.



सूत्रांच्या माहितीनुसार, कारमधील प्रवासी अलुवा येथील आहेत. तर बस थिरुअनंतपुरमला निघाली होती. 


अपघातात 15 जण जखमी झाले असून त्यांना Konni Taluk रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर इतरांवर दुसऱ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बसचालक आणि एक महिला प्रवासी गंभीर जखमी आहे. तर इतर प्रवासी किरकोळ जखमी आहेत.