`हे परत घेऊन जा...`, चिमुरडीचा रेस्तराँमधील VIDEO व्हायरल; नेटकऱ्यांना तिच्या वागण्यावर विश्वास बसेना
सोशल मीडियावर एका चिमुरडीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत चिमुरडी रेस्तराँमधील वेटरला फ्राइज परत घेऊन जाण्यास सांगत आहे. दरम्यान, तिचं कारण ऐकल्यानंतर अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.
फ्रेंच फ्राईजचे जगभरात अनेक चाहते आहेत. लांब, कुरकुरीत बटाट्याचे फ्रेंच फ्राईज चवीला खारट असतात. पण अनेकांना ते खाणं फार आवडतं. त्यामुळेच हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेल्यानंतर स्टाटर म्हणून चघळण्यासाठी फ्रेंच फ्राईज मागवले जातात. फ्रेंच फ्राईजचे चाहते हे एका विशिष्ट वयोगटातील नाहीत. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना ते आवडतात. पण हे आरोग्यासाठी फार चांगले नाहीत हेदेखील तितकंच खरं आहे. यादरम्यान, एका चिमुरडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत चिमुरडी हॉटेलमध्ये फ्रेंच फ्राईज परत करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. तसंच तिने दिलेलं कारण ऐकून अनेकजण तिचं कौतुक करत आहेत
@hanayaandmom या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत चिमुरडी रेस्तराँमध्ये फ्राईज वेटरला परत करताना दिसत आहे. यावेळी ती वेटरला 'मला हे नको आहे' असं सांगते. यामागील कारण विचारलं असता ती सांगते की, 'कारण माझे पप्पा खूप खातात'. यादरम्यान मागून एका महिलेचा आवाज ऐकू येत आहे. महिला चिमुरडीला सांगते की, 'पण तूदेखील खाऊ शकतेस'. त्यावर ती सांगतो की 'मी स्ट्रॉबेरी खात आहे. मला हे जंक नको'. यावेळी चिमुरडी वेटरला हे फ्राईज जंक फूड असल्याचं सांगते.
चिमुरडी वेटरशी बोलत असते तेव्हा तिचे हातवारे आणि चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे आहेत. नेटकऱ्यांना तिचे हे भाव फार आवडले आहेत. यावेळी हातवारे करत ती वेटरला सांगते की, 'यामुळे पोटही दुखतं आणि उलट्याही होतात'.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला 18.4 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यू मिळाले आहेत. अनेकांना मुलीचे शब्द आणि वागणं फार आवडलं आहे. एका युजरने ही चिमुरडी भविष्यातील न्यूट्रिशनिस्ट असल्याचं म्हटलं आहे. तर एकाने लिहिलं आहे की, ही माझी जीम ट्रेनर आहे. तर एका युजरने उपहासात्मकपणे ही आजकालची मुलं सर्व रेस्तराँ बंद करायला लावतील असं म्हटलं आहे.
"ती एक स्टार आहे", "तिने ज्या प्रकारे उलट्या होतील सांगितलं", "हाहाहाहा! ती खूप क्यूट आहे", "किती चांगल्या प्रकारे तिचं संगोपन केलं आहे! पालकांना सलाम. पालकांनी किती प्रयत्न केले असतील याची मला कल्पना आहे", "मला माझी आणि माझ्या खाण्याच्या सवयींची आणि इच्छाशक्तीचीही लाज वाटत नाही," अशा अनेक कमेंट युजर्सनी या व्हिडीओवर केल्या आहेत.