भररस्त्यात तरुणीला फरफटत गाडीत ढकललं, बुक्क्या घातल्या, पण मदतीला कोणीच आलं नाही; धक्कादायक VIDEO व्हायरल
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत एक तरुण तरुणीला भररस्त्यात बेदम मारहाण करत जबरदस्ती गाडीत ढकलत असल्याचं दिसत आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून तपास सुरु केला आहे.
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) एक धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत तरुण एका तरुणीला जबरदस्ती गाडीत ढकलत असून नंतर बुक्क्यांनी मारहाण करत असल्याचं दिसत आहे. यावेळी त्याच्यासोबत असणारा एक तरुण हे सर्व पाहत उभा होता. ही घटना घडली तेव्हा रस्त्यावरुन जाणारे लोक फक्त पाहत होते. एकही व्यक्ती यावेळी त्यांना जाब विचारत नाही, किंवा मदतीला येत नाही. हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून पोलिसांनी याची दखल घेतली आहे.
व्हायरल झालेला हा व्हिडीओ दिल्लीमधील (Delhi) आहे. व्हिडीओत एक तरुण वर्दळीच्या रस्त्यावर तरुणीला जबरदस्ती कारमध्ये ढकलत असल्याचं दिसत आहे. वर्दळीचा रस्ता असल्याने काही कार यावेळी थांबलेल्या होत्या. यादरम्यान एका कारमधील व्यक्तीने हा व्हिडीओ शूट केल्याचं दिसत आहे.
व्हिडीओत काय आहे?
अनवाणी खाली उतरलेला हा तरुण आधी तरुणीला गाडीत ढकलतो. यावेळी कारच्या दुसऱ्या बाजूला आणखी एक तरुण त्यांच्यावर लक्ष ठेवून असतो. तरुणीला गाडीत ढकलल्यावर तरुण तिला मारहाण करताना दिसत आहे. यानंतर तो पुढे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर जाऊन बसतो. आणि दुसरा तरुण त्या तरुणीच्या बाजूला येऊन बसतो.
वर्दळीचा रस्ता असल्याने यावेळी रस्त्यांवरुन अनके दुचाकी आणि चारचाकी जाताना दिसत आहे. पण कोणीही त्या तरुणीच्या मदतीला धाव घेत नाही किंवा त्या तरुणांना नेमकं काय सुरु आहे? अशी विचारणा करत नाही.
नेमकं काय झालं?
मिळालेल्या माहितीनुसार, दोन मुलं आणि एका मुलीने रोहिणी ते विकासपुरीसाठी कॅब बूक केली होती. पण प्रवासात त्यांच्यात काहीतरी वाद झाला. यानंतर तरुणी कार सोडून निघून जात होती. यावेळी तरुणाने तिला पकडलं आणि पुन्हा कारमध्ये ढकलून घेऊन गेले.
पोलिसांकडून तपास सुरु
पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून तपास सुरु केला आहे. गाडीच्या मालकाचा पत्ता हरियाणाच्या गुरुग्राममधील असून, पोलिसांचं पथक तिथे पाठवण्यात आलं आहे. ही कार शनिवारी रात्री 11.30 वाजता गुरुग्राममधील IFFCO चौकात शेवटची दिसली होती.
दिल्ली पोलिसांनी कार आणि चालकाची संपूर्ण माहिती मिळवली असून तिघे नेमके कोणत्या ठिकाणी खाली उतरले याची माहिती मिळवत आहेत. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये अनेकांनी मंगलपूरी फ्लायओव्हरवर ही घटना घडल्याचा उल्लेख केला आहे. उबर अॅपच्या माध्यमातून ही कार रोहिणी ते विकासपूरीसाठी बूक करण्यात आली होती. दोघांमध्ये आधी शाब्दिक वाद झाला आणि नंतर त्याचं रुपांतर हाणामारीत झालं अशी प्राथमिक माहिती आहे.