A man rapes Dog: राजधानी दिल्लीमधील (Delhi) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीत एका श्वानावर लैंगिक अत्याचार (Rape) करण्यात आले आहेत. इंद्रपुरी येथे ही घटना घडली आहे. याआधी हरिनगर येथे अशीच एक घटना समोर आली होती. जे जे कॉलनी येथे एका व्यक्तीने कृत्य केल्याचं समोर असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ आरोपीच्या शेजारीने आपल्या मोबाईलवर रेकॉर्ड केला होता. हा व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला असून व्हायरल (Viral Video) आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जे जे कॉलनीत राहणारे राजेश यांनी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली होती. त्यांच्या घराजवळ सतीश नावाचा तरुण वास्तव्यास होता. तो वारंवार मद्यपान करत होता. 28 फेब्रुवारीला राजेश एका लग्नावरुन घऱी परतले असता त्यांनी कुत्रा रडत असल्याचा आवाज ऐकू आला. यामुळे त्यांनी कुत्रा का रडत आहे हे पाहण्यासाठी धाव घेतली. त्यावेळी त्यांना जे दिसलं ते धक्कादयक होतं. कारण त्या ठिकाणी सतीश हा कुत्र्यावर बलात्कार करत होता. 


राजेश यांनी हे किळसवाणं कृत्य आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केलं. यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी यानंतर सतीशविरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता याआधीही त्याने असं कृत्य केल्याचं समोर आलं आहे. आरोपीने अनेक लहान मुलांना टार्गेट केल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस सध्या आरोपीची चौकशी करत आहेत. 


नुकतंच हरिनगर येथे एका तरुणाने श्वानावर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं होतं. धक्कादायक म्हणजे श्नानावर लैंगिक अत्याचार करतानाचा व्हिडीओ त्याने शूट केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी 26 फेब्रुवारीला गुन्हा दाखल करत याप्रकरणी तपास सुरु केला होता. 


याआधी उत्तर प्रदेशातील गाजियाबादमध्ये अशीच एक घटना घडली होती. एका व्यक्तीने मादी श्वानावर लैंगिक अत्याचार केले होते. सुनेने हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला होता. सासऱ्याची नजर पडल्यानंतर त्याने सुनेला मारहाण करत मोबाइल हिसकावून घेतला होता. सुनेने याप्रकरणी People For Animal (PFA) नावाच्या प्राणीप्रेमी संस्थेला माहिती दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत 60 वर्षीय व्यक्तीला अटक केली.