Chandrayan 3 Viral Video: शुक्रवारी चांद्रयान-3 (Chandrayan 3) अवकाशात झेपावलं आणि अनेक भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’च्या (ISRO) महत्त्वाकांक्षी मोहिमेकडे संपूर्ण देशवासियांच्या नजरा होत्या. दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी ‘एलव्हीएम३-एम४’ प्रक्षेपणयान चंद्राच्या दिशेने झेपावलं आणि भारतीयांनी एकच जल्लोष सुरु केला. श्रीहरीकोटा येथे हे प्रक्षेपण पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक वैज्ञानिक संस्था तसंच शाळांनीही प्रक्षेपणाची व्यवस्था केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चांद्रयान-3 चं लाईव्ह प्रक्षपेण पाहण्यासाठी अनेक कार्यालयांनीही काही काळ काम थांबवत टीव्हीकडे नजरा वळवल्या होत्या. चांद्रयान-3 चं प्रक्षेपण होताच त्यांनी टाळ्या वाजवत आनंद साजरा केला. पण यादरम्यान आता आणखी एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे, जो पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर अक्षरश: काटा येईल. कारण हा व्हिडीओ विमानातील एका प्रवाशाने काढला आहे. 


एकीकडे चांद्रयान-3 ने जमिनीवरुन चंद्राकडे झेप घेतली असताना त्याचवेळी आकाशात चेन्नई-ढाका विमान उड्डाण करत होतं. यादरम्यान एका प्रवाशाने कॅमेऱ्याच चांद्रयान-3 ला कैद केलं आहे. यामध्ये चांद्रयान जमिनीवरुन चंद्राच्या दिशेने जात असताना पाहून छाती अभिनाने फुगेल.  


ISRO च्या मटेरिअल्स आणि रॉकेट मॅन्युफॅक्चरिंग एक्सपर्ट विभागाचे माजी संचालक डॉ पी व्ही वेंकटकृष्णन यांनी ट्विरला हा व्हिडीओ शेअर केला आहे. "Launch of Chandrayan 3 from Flight" अशी कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिली आहे. 



विमान चेन्नईहून ढाकासाठी निघाल्यानंतर पायलटने हा ऐतिहासिक क्षण पाहा अशी घोषणा केली आणि सर्व प्रवाशांच्या नजरा तिथे वळल्या. 


हा व्हिडीओ ट्विटरला शेअर केल्यानंतर जबरदस्त व्हायरल झाला आहे. लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून, अनेकजण तर तो पाहिल्यानंतर नि:शब्द झाले आहेत. 



तथापि, चांद्रयान-3 ला पृथ्वीपासून चंद्रापर्यंतच प्रवास करण्यासाठी सुमारे एक महिना लागण्याचा अंदाज आहे. 23 ऑगस्टला लँडिंग होईल असं अपेक्षित आहे. लँडिंग केल्यानंतर, ते चंद्राच्या कक्षेत स्थिरावेल. चंद्रावरील एक दिवस पृथ्वीवरील १४ दिवसांच्या बरोबरीचा असतो.


चांद्रयान मोहिमेचे तीन मुख्य टप्पे आहेत. चांद्रयान चंद्राच्या कक्षेत स्थिरावणे, अलगद अवतरण (सॉफ्ट लँडिंग), आणि ’‘लँडर’मधून रोव्हरची चांद्रपृष्ठावर सफर हे मुख्य ध्येय आहेत. 


याआधी चांद्रयान-2 अपयशी ठरल्याने इस्त्रोच्या शास्त्रज्ञांसह सर्व भारतीय निराश झाले होते. 20 ऑगस्ट 2019 ला ‘चांद्रयान-२’ने चंद्राच्या ध्रुवीय कक्षेत प्रवेश केला होता. 2 सप्टेंबर 2019 ला चंद्राच्या ध्रुवीय कक्षेत १०० किलोमीटरवर चंद्राभोवती फिरताना विक्रम लँडर वेगळं झालं होतं. चंद्राच्या पृष्ठभागापासून 2.1 किलोमीटर उंचीवर लँडरशी इस्रोच्या शास्त्रज्ञांचा संपर्क तुटला होता. हे यान कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. ही मोहीम अपय़शी झाल्याने भारतीयाचं स्वप्न भंगलं होतं. पण यावेळी मात्र भारती स्वप्न पूर्ण करत मोठ्या देशांच्या यादीत सहभागी होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.