Viral Video: सर्वसामान्य नागरिक आणि पोलिसांमध्ये अनेकदा वाद होत असतात. कर्तव्यावर असणारे पोलीस कर्मचारी आणि सर्वसामान्यांमधील हा वाद अनेकदा हाणामारीपर्यंत पोहोचतो. त्याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र पोलिसांवर हात उचलणाऱ्या या नागरिकांना सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणल्याने कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागतं. दरम्यान, अशीच एक घटना पुन्हा एकदा घडली आहे. दिल्लीत एका महिलेने पोलीस कर्मचाऱ्यावर हात उचलला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर दिल्लीमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक महिला रस्त्यावरच कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण करताना दिसत आहे. वर्दळीच्या या रस्त्यावर महिला त्याच्या कानशिलात लगावताना दिसत आहे. दरम्यान महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण का करत होती हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. 


व्हिडीओत महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करताना दिसत आहे. यावेळी रस्त्यावरील लोक तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतानाही ती थांबत नाही. तिला काहीजण कायदेशीर कारवाईची धमकी देतात. मात्र त्यानंतरही ती शांत होत नाही. दरम्यान महिला असल्याने पोलीस कर्मचारी तिला काही उत्तर न देता हतबलपणे पाहताना दिसत आहे. यानंतर ती गाडीत बसून निघून जाते. 



हा व्हिडीओ ट्विटरला एका अकाऊंटला शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला 86 हजारांहून जास्त लोकांनी पाहिलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी संताप व्यक्त केला असून, महिलेविरोधात कडक कारवाई केली जावी अशी मागणी केली आहे.