Viral Video: तणाव कमी करण्यासाठी PPE Kit मध्येच वरातीत डान्स करु लागला अॅम्ब्यूलन्स ड्रायव्हर
भारतात कोरोना रुग्णाची संख्या वाढतच चालाली आहे आणि यामुळे सर्वजण घाबरून आपल्या घरात बसले आहेत.
हल्द्वानी : भारतात कोरोना रुग्णाची संख्या वाढतच चालाली आहे आणि यामुळे सर्वजण घाबरून आपल्या घरात बसले आहेत. परंतु असे बरेच लोक आहेत, जे दिवसेंदिवस कोरोना-संक्रमित लोकांच्या सेवेत गुंतले आहेत, त्यांची काळजी घेत आहेत. डॉक्टर, परिचारिका, पोलिस, अॅम्ब्यूलन्स ड्रायव्हर आणि इतर आरोग्य कर्मचारी तासन्तास पीपीई किट घालून लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात एका कोरोना वॉरियरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
वरात पाहाताच नाचू लागला ड्राइव्हर
ही घटना उत्तराखंड (Uttarakhand) मधील हल्द्वानीतील (Haldwani) आहे. देशभरातील हेल्थकेयर वर्कर्स (Healthcare Workers) या दिवसात जनतेच्या सेवत गुंतलेले आहे. जनतेच्या सेवेत ते इकते गुंग होतात की, 9 ते 10 तास ते काही खात पीत देखील नाही. अशात डॅाक्टरच काय तर अॅम्ब्यूलन्स ड्रायव्हर्स देखील तितकेच जनतेच्या सेवेत स्वत:ला झोकून देत आहेत. त्यांच्यावर देखील बराच ताण आहे. ते न आराम करता दिवस-रात्रं काम करत असतात, ज्यामुळे त्यांच्यावर मानसिक आणि शरीरीक ताण येतो.
हल्द्वानीतील (Haldwani) अॅम्ब्यूलन्स ड्रायव्हर लग्नाची वरात पाहूण स्वत: ला थांबवू शकला नाही. तो अॅम्ब्यूलन्समधून बाहेर पडून पीपीई किटमध्येच लोकांसोबत नाचू लागला.
डान्समुळे ताण कमी झाला
पीपीई किटमध्ये अॅम्ब्यूलन्स ड्रायव्हर्सला नाचताना पाहून ग्रामस्थ घाबरले आणि त्याच्यापासून दूर जाऊ लागले. त्यानंतर ड्रायव्हर महेशला विचारण्यात आले की, तो वरातीत का नाचत आहे? यावर त्याने सांगितले की, "दिवसरात्र कोविड रूग्ण पाहून आणि त्यांना सेवा देऊन आमच्यावर तणाव येतो. अशा परिस्थितीत, या बँन्ड- बाज्याचा आवाज ऐकून मी स्वत:वर नियंत्रिण ठेऊ शकलो नाही आणि तणाव कमी करण्यासाठी त्यांच्याबरोबर नाचू लागलो आणि डान्स केल्यामुळे माझा ताण कमी झाला आहे."