मुंबई : आजकाल सोशल मीडियावर लग्नाच्या व्हिडीओंचा जणू काही पूरच आला आहे. सगळेच लोक हळदी, मेहंदी, संगीत तसेच लग्नाच्या प्रत्येक विधीचा व्हिडीओ शेअर करत असतात. यापैकी काही व्हिडीओ इतके मजेदार आहेत की ते हसणे थांबवू शकत नाहीत. तर तेथे बरेच व्हिडीओ इतके भावनिक असतात की तुमच्या डोळ्यात अश्रू येतात. ज्याला यूझर्सकडून देखील खूप पसंती दर्शवली जाते. आज आम्ही असाच एका व्हिडीओबद्दल तुम्हाला सांगणार आहोत, ज्याला सध्या सोशल मीडियावर जोरदार शेअर केले जात आहे. या व्हिडीओमध्ये वधूचा स्वॅग पाहण्यासारखा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सहसा वधू तिच्या लग्नाला छान तयार होऊन येते. खूप अनोळखी लोकांना पाहून ती बावरते, लाजते. परंतु सध्याच्या वधूंचा स्वॅगच काहीसा वेगळा आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील वधू ही बिंधास्त आहे. ती स्वत: नाचत नाचत स्वतःच्या लग्नात स्टेज पर्यंत पोहोचते. या व्हिडीओमध्ये, वधू लाल रंगाच्या जोड्यामध्ये नाचत येते, तिच्या सोबत तिच्या मैत्रीणीही नाचत असल्याचे तुम्ही पाहू शकता.


‘मेरे हाथों में है जो मेहंदी’ या गाण्यावरजबरदस्त डान्स करताना वधू ग्रॅंड एन्ट्री करते. वधूची ही शैली पाहून नवरदेवही स्वतःला थांबवू शकला नाही तो तिला त्याच्याकडे बोलावू लागला.  एवढेच नाही, तर डान्सच्या शेवटी, वधू आणि वर शाहरुख खान स्टाईलमध्ये हात पसरून पोज देतात.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हा व्हिडीओ दुल्हनिया नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला गेला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लोक ही व्हिडीओ क्लिप केवळ एकमेकांसोबत शेअर करत नाहीत, तर त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स आणि प्रतिक्रिया देखील देत आहेत. नक्कीच ही वधूची शैली पाहण्यासारखी आहे.