मुंबई : देशात सर्वत्र उष्णता वाढू लागली आहे. काही भागात तर उष्माघात सुरु झाला आहे, ज्यामुळे लोकं दुपारच्यावेळी आपल्या घरातून बाहेर देखील पडत नाहीत. राजस्थानमध्ये देखील उष्णतेने आपल्या उच्चांक गाठला आहे. उष्णतेमुळे तेथील परिस्थीती इतकी खराब झाली आहे की, तुम्हाला विश्वास देखील बसणार नाही. खरंतर मरुधारातील वाळवंटामधील एक व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला धक्का बसेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर मरुधारातील वाळूचे ढिगारे इतके गरम होऊ लागले आहेत की, त्यावर पापड देखील भाजता येत आहे. पश्चिम राजस्थानमध्ये 45 ते 47 अंश तापमान आहे आणि इतक्या तापमानात सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी भारत-पाकिस्तानच्या सीमेवर वाळूत पापड भाजून दाखवले आहेत आणि त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडीयावर चर्चेचा विषय ठरला आहे.


हा व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील कल्पना येईल की, आपला भरतीय जवान कोणत्या परिस्थितीत देशाच्या सुरक्षेसाठी दटून उभा आहे.


हा व्हिडीओ बिकानेर जिल्ह्यातील आहे. या व्हिडीओमध्ये बिकानेर जिल्ह्यातील बज्जू भागात बीएसएफ जवानांनी काही काळ पापड वाळूच्या आत ठेवले होते. लगेच हे पापड वाळूवर भाजले गेले. जवानांनी यासर्व परिस्थीचा व्हिडीओ बनवला आणि तो शेअर केला.


व्हिडिओमध्ये बीएसएफ जवानांनी हा भाजलेला पापड आपल्या हातात घेऊन त्याचा चुरा करुन दाखवला. त्यांचा हा व्हिडीओ पाहून तुमच्या लक्षात येईल की, पापड पुर्णपणे भाजला गेला आहे.



तसेच हा व्हिडीओ पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की, इतक्या गरम वाळूमध्ये या सैनिकांना कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.


राजस्थानमध्ये सध्या कडक ऊन पडत आहे. अशा परिस्थीतीत वाळूच्या ढिगाऱ्यावर पाऊल ठेवणे म्हणजे, अंगारावर पाऊल ठेवण्यासारखे आहे. बिकानेर जिल्ह्यात आठवडाभरापासून सरासरी तापमान ४५ ते ४७ अंशांच्या दरम्यान राहिले आहे. बाडमेर, जैसलमेर आणि जोधपूरमध्येही हीच परिस्थिती कमी-अधिक आहे.