मुंबई : बैल महोत्सवाशी निगडित असे अनेक व्हिडीओ समोर येत असतात, जे पाहून आपले बऱ्याचदा मनोरंज होते. परंतु काही वेळा बैल महोत्सवामध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्या जीवघेण्या ठरल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बाईकवर बसलेल्या महिलेला बैलाने जोरदार धडक दिल्याचे पाहायला मिळत आहे. ही टक्कर इतकी जोरदार होती की ही महिला दुचाकीवरून खाली जमीनीवर पडली. या घटनेच्या वेळी तेथे शेकडो लोक तेथे उपस्थित होते आणि ते बैलाच्या या सणाचा आनंद लुटत होते. परंतु या घटनेनंतर उपस्थीत सगळे लोकं थक्कं झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावरील हा व्हिडिओ दक्षिण भारतातील असल्याचे समोर आले आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, शेकडो लोक जमिनीवर आणि छतावर बसले आहेत, तेवढ्यात एक बाईक गेली ज्यावर महिलाही बसली होती. पुढच्याच क्षणी तेथू एक बैल वेगाने धावत येतो आणि त्या महिलेला वेगाने धडकतो.


महिलेला काही समजण्यापूर्वीच ती बाईकवरुन खाली पडते. या घटनेनंतर काही लोक धावत जाऊन महिलेच्या जवळ पोहोचतात. हा व्हिडीओ येथेच संपला ज्यामुळे पुढे नक्की काय झालं? या महिलेला फार लागलं की नाही हे मात्र समजलेलं नाही.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


व्हिडीओमध्ये दिसणारे दृश्य खूपच धोक्कादायक आहे. बुल फेस्टिव्हलशी संबंधित कार्यक्रम जगभरातील देशांमध्ये आयोजित केले जातात. लोकांना ते खूप आवडते. पण अशा प्रसंगात जीवाला धोका आहे यात शंका नाही. याशी संबंधित असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यापासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.