तुम्हाला काय वाटतं, ही कार येथून युटर्न मारु शकेल की खाली जाईल? पाहा थरारक व्हिडीओ
डोंगर दऱ्यातुन रस्त्यावर गाडी चालवण्याची मजाच वेगळी असते. ज्यामुळे सध्याची तरुणाई आपली कार किंवा बाईक काढताता आणि फेरफटका मारायला निघून जातात.
मुंबई : डोंगर दऱ्यातुन रस्त्यावर गाडी चालवण्याची मजाच वेगळी असते. ज्यामुळे सध्याची तरुणाई आपली कार किंवा बाईक काढताता आणि फेरफटका मारायला निघून जातात. सध्या अशाच एका ड्रायव्हरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना भीती वाटू लागली आणि या व्यक्तीची ड्रायविंग पाहून लोकं फार घाबरले आहेत. लोकांना हा व्हिडीओ पाहाताना मनात प्रश्न उभा राहत आहे की, याची गाडी खाली जाईल? की हा ड्रायव्हर युटर्न मारण्यात यशस्वी होईल?
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक छोटा रस्त्ता आहे. हा रस्ता इतका छोटा आहे की, येथून सायकलने देखील युटर्न मारनं अशक्य आहे, तेथे हा व्यक्ती कारमधून युटर्न घेत आहे. हे दृश्य अंगावर काटा आणणारं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक निळ्या रंगाची कार अरुंद डोंगरी वाटेवरून युटर्न मारताना दिसत आहे. परंतु ज्या रस्त्याने वाहन वळवले जात आहे, तो रस्ता खूपच अरुंद आहे. गाडी वळवतानाही त्याचे मागचे टायर डोंगराच्या अगदी कडेवरती येत आहेत. जे पाहताना असे वाटते की, ही गाडी आता खाली पडेल. परंतु कार चालकाचे अप्रतिम नियंत्रण आहे. ज्यामुळे तो गाडी खाली खड्ड्यात पडू देत नाही.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या रस्त्याच्या एका बाजूला डोंगर आहे आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी आहे आणि या मार्गावर कार उभी आहे जी, युटर्न घेत आहे.
ड्रायव्हरने ज्या पद्धतीने त्याची गाडी वळवली ते खरोखरच अप्रतिम आहे. व्हिडीओसोबतचे कॅप्शन असे लिहिले आहे - 80 पॉइंट टर्नचा परिपूर्ण नमुना. हा व्हिडीओ डॉक्टर अजयिताने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक जण अवाक् झाले. या व्हिडीओला आतापर्यंत 1 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
हा व्हिडीओ खरा आहे का, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. या व्हिडीओचं सत्य अद्याप समोर आलेलं नाही. मात्र हा व्हिडीओ लोकांना फार आवडत आहे.