मुंबई : सोशल मिडियावर वाईल्ड लाईफशी निगडीत अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. या माध्यमातून आपल्याला वन्यजीवन अगदी जवळून पाहण्याची संधी मिळते. सोशल मीडियावरील काही व्हिडीओ फार मजेशीर असतात, तर काही व्हिडीओ आपल्याला आश्चर्यचकित करतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका सरड्याचा आहे. आपल्याला हे माहित आहे की, सरडा रंग बदलतो. परंतु रंग बदलणारा सरडा आपण फार कमी वेळा पाहिला असणार.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही जरी रंग बदलणारा सरडा पाहिला असला तरी त्याला एकदा किंवा जास्तीत जास्त दोन वेळा रंग बदलताना पाहिले असणार, परंतु आमच्याकडे जो व्हिडीओ आहे, त्यामध्ये हा सरडा चक्कं 7 ते 8 वेळा रंग बदलत आहे. जे खरोखरंच खूप सुंदर आहे.


आजच्या धावपळीच्या काळात आपल्याला निसर्गाला आणि त्यातील रम्य अशा बदलांना जवळून पाहण्याची संधी फार कमी वेळा पाहायला मिळते. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेऊ शकतो.


आयपीएस ऑफिसर रुपिन शर्मा नेहमीच आपल्या ट्विटर अकाउंटवरुन काहीना काही व्हिडीओ शेअर करत असतात. जे खरोखरचं खूप सुंदर आणि मनोरंजक असतात. नेहमीप्रमाणेच त्यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा एका सरड्याचा व्हिडीओ आहे. व्हिडीओतील हा सरडा दोन मिनिटांत चक्कं 7 ते 8 वेळा रंग बदलतो.


व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्हाल सरडा गुलाबी रंगाचा पाहायला मिळेल. त्या रंगाच्याच वेगवेगळ्या छटांमध्ये देखील तो रंग बदलतो. त्यानंतर तो हिरव्या रंगाचा होतो. बघता बघता नंतर तो निळा, सेफ्रॉनसारख्या रंगात बदलून जातो.



हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल ना? हा व्हिडीओ अशा पद्धतीने शूट करण्यात आला आहे की, त्याला पाहून तुम्हाला घरबसल्या डिस्कव्हरी चॅनल पाहत असल्याचा भास होईल.


रुपिन शर्मा यांनी व्हिडीओ शेअर करत म्हटलंय की, हा व्हिडीओ विक्रम पोनप्पा यांनी शूट केला आहे. तसेच व्हिडीओला फुल स्क्रिनमध्ये पाहावा असा संदेशही त्यांनी यूजर्सना दिलाय.


विक्रम पोनप्पा हे प्रसिद्ध आर्किटेक्ट आणि फोटोग्राफर आहेत. बऱ्याचदा ते आपल्या ट्विटर अकांऊटवर मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतात.