Viral News: सोशल मीडियावर (social media) कायमच ,व्हायरल व्हिडीओची (viral video) चर्चा होत असते. रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. वन्यप्राण्यांचे व्हिडीओ म्हटलं की नेटकऱ्यांचा जीव की प्राण. पण सापाचे व्हिडीओ म्हटलं की व्हिडीओ बघतानाच थरकाप उडतो. 
सापाचं नुसतं नाव जरी काढलं , तरी अंगाचा थरकाप उडतो. कोब्रा प्रत्यक्षात समोर आला तर सांगायलाच नको. पण सापाला वरचढ चढेल असा एक प्राणी आहे तो म्हणजे मुंगूस. साप आणि मुंगूसाचं वैर सर्वश्रूत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोघं एकमेकांसमोर आले तर झुंज होणार हे निश्चित असतं. या दोघांमध्ये मुंगूस हा वरचढ असतो,  साप आणि मुंगुसच्या फायटिंगचे अनेक व्हिडीओ (snake mongoose viral video) आपण या आधी पाहिले असतील, पण सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. 


जो व्हिडीओ सध्या व्हायरल (viral video) होतोय त्यात आपण पाहू शकता, एक कोब्रा भर रस्त्यात फना काढून बसल्याचं दिसत आहे. एवढ्यात तिथे एक मुंगूस येतो आणि मग काय दोघांची नजरानजर होते आणि दोघेही शत्रू एकमेकांवर तुटून पडतात. कोणत्या जन्मच वैर या दोघांमध्ये आहे कोणास ठाऊक पण एकमेकांच्या नजरेससुद्धा भिडत नाहीत कि तुटून पडतात. 


हे दोघे भर रस्त्यात एकमेकांवर तुटून पडलेत. उड्या मारत उड्या मारत एकमेकांना मारू लागतात. दोघांपैकी कोणीही हार मानायला तयार नसल्याचं दिसतं. रस्त्यावर उपस्थित असलेले लोक दुरूनच वाहनांवर बसून हे दृश्य पाहतात. मात्र कोणीही पुढे येण्याचे धाडस करत नाही. मात्र साप आणि मुंगूसची झुंज मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित करतात. अखेर मुंगूस त्या सापाला मारतो आणि जंगलात घेऊन जातो. आणि इथे ही लढाई थांबते. 


आतापर्यंत सोशल मीडियावर या व्हिडिओला खूप लाईक्स मिळाले आहेत. 


कोब्रा आणि मुंगूसचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर (instagram) वेगाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत 4 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.



तसेच नेटकरी वेगवेगळ्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करत आहे. एका युजर्सने लिहिलं आहे की, ''अशी झुंज मी यापूर्वी कधी पाहिली नव्हती''. तर दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, ''अखेर मुंगूस जिंकला.''