मुंबई : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. प्राणीप्रेमी अनेकदा इंटरनेटवर त्यांचे फोटो, व्हिडीओ बघण्यात वेळ घालवतात. हे व्हिडीओ खरोखरचं खूप सुंदर आणि मनमोहक असतात. तर काही व्हिडीओ हे आपले मनोरंजन करतात. जे पाहून आपण आपले हसू रोखू शकत नाही. एकीकडे, जिथे प्राणीप्रेमी आपल्या पाळीव प्राण्यांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे ठेवतात, तर दुसरीकडे असे काही लोक आहेत, ज्यांना निष्पाप प्राणांना विनाकारण त्रास देणे आवडते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही लोक विनोदाने प्राण्यांना त्रास देत असतात. त्यांना प्राण्यांना त्रास दिल्याने आनंद मिळतो, परंतु हा खोडकरपणा बऱ्याचदा अशा लोकांच्या अंगाशी येतो. हे तुम्ही पाहिलं असणार. असेच काहीसे या तरुणासोबत घडले, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये कोंबड्याला त्रास देण्यासाठी गेलेल्या तरुणाला कोंबड्याला त्रास देणं महागात पडलं.


कोणत्याही प्राण्यांना हलके घेण्याची चूक करू नका. मग तो जंगली प्राणी असो किंवा पाळीव. प्राण्यांना एकदा का कोणाचा राग आला की, ते काय करतील याचा काही नेम नाही. तुम्ही बऱ्याचदा गाईचे व्हिडीओ पाहिले असतील, ज्यामध्ये गाय रस्त्यातील व्यक्तींना आपल्या शिंगानी उडवण्याचा प्रयत्न करते. परंतु तुम्ही कधी कोंबड्याला एका माणसाला घाबरवल्याचं पाहिले आहे का?


हा व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण त्याच्या जवळ उभा असलेल्या कोंबड्याजवळ काठी घेऊन जातो आणि कोंबड्याला घाबरवण्याचा आणि मारण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्या कोंबड्याला असा काही राग येतो की, तो या तरुण आणि त्याच्या काठीला न घाबरता सरळ त्याच्या अंगावर उडी मारतो. हे पाहून तो तरुण तेथून धूम ठोकते आणि उंचावरुन अशी काही उडी मारतो की, बस रे बस. हा तरुण नंतर मागे वळून देखील पाहत नाही आणि सरळ घरचा रस्ता पकडतो.


कधीकधी अगदी लहान प्राणी देखील त्याच्या बचावामध्ये अशा प्रकारे प्रतिकार करतात की, केवळ माणसांचीच नव्हे, तर सर्वात मोठ्या प्राण्यांची देखील हवा टाईट होते. असेच काहीसे या कोंबडीने केले, ज्याने त्याच्यावर हल्ला करणाऱ्या मुलाला चांगला धडा शिकवला.


या कोंबड्याने जे काही या मुलासोबत केलं आहे हे पाहून सोशल मीडियावर लोकांनी या व्हिडीओला खूप पसंत केलं आहे.  यामुळेच हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर hepgul5  नावाच्या अकाउंटवरुन शेअर केले गेले आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


लोक केवळ हा व्हिडीओ शेअरच करत नाहीत, तर त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स आणि प्रतिक्रिया देखील देत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'कोंबडीची छेड काढणाऱ्या या मुलाबरोबर हे चांगले झाले. त्याला चांगला धडा मिळाला.' तर दुसऱ्या युजर ने लिहिले की, 'श्रावण संपायच्या आधी तो कोंबड्याजवळ गेला म्हणून त्याच्यासोबत असे घडले.'