मुंबई : सोशल मीडियावर रोज आपल्याला वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात. यातील काही व्हिडीओ असे आहेत की कितीही वेळा पाहिले तरी मन भरत नाही. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो एका कपलशी संबंधित आहे. दोघेही ट्रेनमध्ये बसले होते. तेव्हा ते दोघेही असं काहीतरी करतात. जे पाहून तुम्हाला देखील विश्वास बसणार नाही. ट्रेनमधील रोमीओ आणि ज्युलीयेटचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये सर्व प्रवासी ट्रेनमध्ये बसलेले दिसत आहेत. त्याच प्रवाशांमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहे, जे पुढच्या आणि मागच्या सीटवर बसले आहेत. काही वेळाने मुलगा सीटच्या खाली हात घेतो आणि मुलीला हे आधीच माहित असतं.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


मुलीच्या हातात देखील एक चिठ्ठी असते, जी ती या मुलाला देत असते. अखेर ही मुलगी गुपचुपपणे आपल्या हातातील चिठ्ठी त्या मुलाला देते. या ट्रेन प्रवासात हे दोघेही चतुराईने एकमेकांवरील प्रेम व्यक्त करत आहेत.


या दोघांचा हा व्हिडीओ लोक पुन्हा पुन्हा पाहत आहेत. हा व्हिडीओ sakhtlogg नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे. तथापि, काही लोक म्हणतात की, ते पूर्णपणे स्क्रिप्टेड आहे. पण ते काहीही असलं तरी लोक या व्हिडीओला मनोरंजक दृष्टीने पाहात आहेत.