मुंबई : सोश मीडियावर आपल्याला नेहमीच वेगवेगळ्या व्हिडीओ पाहायला मिळतात. यामधील काही व्हिडीओ हे मजेदार असतात, तर काही धक्कादायक. त्यांच्या अगळ्यावेगळ्या गोष्टीमुळे हे व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागतात. असाच एका रुग्णालयातील व्हिडीओ समोर आला आहे. जो सर्वांनाच विचार करायला लावत आहे. हा व्हिडीओ डॉक्टर एका पेशन्टला करत असलेल्या मारहाणीचा आहे. जो पाहून सगळेच लोक थक्कं झाले आहेत. ही घटना ओडिशामधील कालाहंडी जिल्ह्यातील धर्मगड उपविभागीय रुग्णालयातील असल्याचे समोर येत आहे. येथे एक डॉक्टर आणि रुग्णामध्ये विचित्र घटना घडली. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामध्ये डॉक्टर रुग्णाला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. डॉक्टरांने रुग्णाला जमिनीवर आडवं पाडून चपलेने मारहाण केल्याचे दिसून येते.


बऱ्याचदा जेव्हा रुग्ण डॉक्टरांकडे जातो तेव्हा डॉक्टर त्यावा आडवं झोपवून तपासतात आणि त्यावर औषध गोळ्या देतात. परंतु या डॉक्टरने मात्र रुग्णाला जमिनीवर आडवं पाडून धू-धू धुतलं. एवढंच काय तर त्याला लाठ्या-काठ्यांनीही मारलं. त्यानंतर सुरक्षा रक्षकांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.


नक्की काय घडलं?


या प्रकरणी स्थानिक लोकांनी सांगितले की, रविवारी रात्री 10.30 च्या सुमारास धरमगड परिसरातील एक व्यक्ती पोटात प्रचंड दुखत असल्याच्या तक्रारीमुळे रुग्णालयात गेला होता. डॉक्टर तेथे न दिसल्याने त्यांनी आरडा-ओरडा सुरु केला. यानंतर या तरुणाची रूग्णालयातील डॉक्टर शैलेशकुमार डोरा यांच्यासोबत वादावादी झाली. त्यानंतर डॉक्टरने रुग्णाला मारहाण केली.


परंतु या घटनेबद्दल सांगताना रुग्ण म्हणाला की, "पोटात असह्य दुखू लागल्याने मी दवाखान्यात गेलो, तेव्हा माझ्यावर उपचार करण्यासाठी तेथे एकही डॉक्टर उपस्थित नव्हता. मी सुरक्षा रक्षकाला विचारले असता, त्याने सांगितले की, डॉक्टर वॉशरूमला गेले आहेत. काही वेळाने वैद्यकीय कर्मचार्‍यांपैकी एकाने दोन इंजेक्शन्स दिली. मी स्ट्रेचरवर होतो. त्यावेळी डॉक्टर अचानक माझ्याजवळ आले आणि त्यांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली."



डॉक्टरांच्या अटकेची मागणी करत रुग्ण आणि स्थानिक नागरिकांनी सोमवारी रास्ता रोकोही केला. डॉक्टर आणि रुग्णाच्या वतीने स्थानिक पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.


धरमगडचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) धीरज कुमार चोपदार म्हणाले, "आम्ही गुन्हा दाखल केला आहे आणि या घटनेबाबत डॉक्टरांना ताब्यात घेतले आहे. आता या घटनेबाबत पुढील तपास सुरू आहे."