Viral Video of Hanuman Drone : दसऱ्याचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. या निमित्ताने अनेक कार्यक्रम देखील आयोजित केले होते. रामलिला आणि इतर कार्यक्रमांमुळे संपूर्ण देशात आनंदोत्सव साजरा केला गेला होता. त्याचे काही व्हिडीओ (Viral Video) देखील समोर आले होते. अशातच आता हनुमानाचा एक व्हिडीओ (Hanuman drone flying in the sky) समोर आला आहे. यामध्ये हनुमान पौराणिक कथेप्रमाणे उड्डाण करताना दिसतोय. हे दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्याचं पारणं फिटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ समोर आलाय. विनाल गुप्ता यांनी इंस्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केला होता.  विनाल गुप्ता हे छत्तीसगढ़ शहर अंबिकापुरमधील शिक्षक आहेत. ऑक्टोबरमध्ये दशहरा समारंभाच्या वेळी लोकांनी गर्दी केली होती. त्यावेळी अचानक मशीनचा आवाज येऊ लागला. पाहतो तर काय! एका हनुमानची प्रतिकृती डोक्यावरून उडत होती. लोकांनी या मुर्तींचा आशीर्वाद घेतला. त्याचा व्हिडीओ लोकांना आवडला असून अनेकांनी हा व्हिडीओ शेअर देखील केलाय.


झालं असं की, दसऱ्या निमित्त मंडळांनी रामलिलाचा कार्यक्रम ठेवला होता. त्यावेळी काही तरुण पोरांनी खरा खुरा हनुमान तयार करायचा निश्चय केला. पोरांनी ड्रोनच्या मदतीने हनुमानच्या प्रतिकृतीचं वजन झेपेल, असं ड्रोन शोधून काढलं आणि त्याचे प्रयोग केले. त्यावेळी त्यांना यश आलं. त्यानंतर त्यांनी उत्सवानिमित्त ड्रोन उडवून पाहिले. 



दरम्यान, आधुनिक तंत्रज्ञान आणि धर्म यांची सांगड घालणं गरजेचं आहे. यामुळे अनेक गोष्टींचा उलघडा होण्यास मदत होते. धर्म आपल्याला जगण्याची शैली शिकवतं तर तंत्रज्ञान आपल्या भविष्याला दिशा देतं. नऊ वर्षापूर्वी हनुमान ड्रोनचं दृष्य पहायला मिळालं होतं.