`या लोकांनी आग लावली आहे,` आई आणि मुलगी घरात जिवंत जळाली, पाहा VIDEO
Kanpur Dehat Mother Daughter Burned Alive: कानपूर देहात (Kanpur Dehat) येथे अतीक्रमण हटवण्यासाठी (Demolition) आलेल्या पथकावर एका आई आणि मुलीच्या हत्येचा ठपका बसला आहे. आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. यामध्ये प्रमिला आणि त्यांची मुलगी नेहा दिसत आहेत. प्रमिला यावेळी या लोकांनी आग लावली असल्याचं ओरडून सांगताना ऐकू येत आहे.
Kanpur Dehat Mother Daughter Burned Alive: कानपूर देहात (Kanpur Dehat) येथे सोमवारी अतीक्रमण हटवण्यासाठी आलेल्या पथकामुळे एका आई आणि मुलीने जीव गमावल्याचा आरोप आहे. याप्रकरणी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांसहित इतर लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासह जेसीबीच्या चालकाला अटक करण्यात आली असून, एका अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे. अतीक्रमण हटवताना जे काही झालं ते ह्रदयद्रावक होतं.
कानपूर देहात जिल्हा प्रशासन अतीक्रमण हटवण्यासाठी पोहोचलं होतं. मात्र प्रशासनावर आई आणि मुलीची हत्या केल्याचा डाग लागला आहे. घटनास्थळाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, अतीक्रमण हटवतानाचा हा व्हिडीओ आहे.
या व्हिडीओत प्रमिला आणि त्यांची मुलगी दिसत आहे. झोपडीवर बुलडोझर चालवण्यात येणार असतो तितक्यात प्रमिला आपण जीव देऊ असं सांगत दरवाजा बंद करतात. यानंतर महिला पोलीस दरवाजाजवळ पोहोचतात. यावेळी प्रमिला या लोकांनी आग लावली आहे असं ओरडू लागतात.
याचवेळी एक व्यक्ती आग लागली आहे, पाणी आणा असं ओरडतो. प्रमिला पुन्हा एकदा या लोकांनी आग लावली आहे असं ओरडू लागतात. प्रमिला यांचा मुलगा शिवमने केलेल्या आरोपानुसार, जेसीबी चालक दीपकने झोपडी पाडली. एसडीएम ज्ञानेश्वर प्रसाद यांनी आग लावा, कोणी वाचलं नाही पाहिजे असं सांगितलं होतं.
काय आहे नेमकं प्रकरण?
कानपूर देहातच्या रुरा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या मडौली गावात अतीक्रमण हटवत असताना झोपडीतील आई आणि मुलीचा जिवंत जळून मृत्यू झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. नातेवाईकांनी हे दोन्ही मृतदेह उचलण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री येणार नाहीत, तोवर मृतदेह स्वीकारणार नाही असा निर्णय त्यांनी घेतला आहे. यासह बुलडोझर चालवणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
मडौली गावचे रहिवासी असणारे कृष्ण गोपाल दीक्षित यांच्यावर गावातील जमिनीवर अतीक्रमण केल्याचा आरोप आहे. जानेवारीत महसूल विभागाने कृष्ण गोपाल यांच्याविरोधात अतीक्रपण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणी एसडीएम मैथा ज्ञानेश्वर प्रसाद यांच्या नेतृत्वात महसूल, पोलीस आणि प्रशासन विभाग अतीक्रमण हटवण्यासाठी पोहोचलं होतं.
अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर कृष्ण गोपाल यांच्या झोपडीवर बुलडोझर चालवला. यावेळी अधिकारी आणि कुटुंबीयांमध्ये वाद झाला. यादरम्यान झोपडीत आग लागली आणि या आगीत कृष्णगोपाल यांची पत्नी प्रमिला दिक्षित व 23 वर्षीय मुलगी नेहा जिवंत जळाले.