Viral Video: केमिकलमध्ये बुडवल्यानंतर सुकलेल्या पालेभाज्यांचं जे झालं ते पाहून तुमचेही डोळे विस्फारतील, पाहा धक्कादायक VIDEO
Viral Video: आपल्या जेवणात असणाऱ्या पालेभाज्या (Vegetables) नेमक्या कुठून येतात असा विचार तुम्ही कधी केला आहे का? नसेल केला तर हा व्हिडीओ (Viral Video) तुम्ही नक्की विचार करण्यास भाग पाडेल. याचं कारण तुम्हाला बाजारात विकत घेताना दिसणाऱ्या हिरव्यागार भाज्या या केमिकलमध्ये (Chemical) बुडवून अगदी ताज्या केलेल्या असू शकतात.
Viral Video: बाजारात जेव्हा कधी आपण पालेभाज्या विकत घेण्यासाठी जातो तेव्हा त्या अगदी हिरव्यागार आणि ताज्या असाव्यात हे आपण कटाक्षाने निरखून पाहत असतो. पण बाजारातून आपल्या ताटापर्यंत येणाऱ्या या पालेभाज्या नेमक्या कशा पिकवण्यात आल्या आहेत किंवा कुठून आल्या आहेत याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? नसेल तर सध्या व्हायरल झालेला एक व्हिडीओ मात्र तुम्हाला ही विचार करण्यास नक्की भाग पाडेल. कारण या व्हिडीओत पालेभाज्या केमिकलमध्ये बुडवल्यास पुढे काय होतं हे दाखवण्यात आलं असून, हे पाहिल्यानंतर तुमचेही डोळे विस्फारतील.
भाजीविक्रेते अनेकदा आपली भाजी विकण्यासाठी अनैसर्गिक पद्धतींचा वापर करत असतात. आपल्यापैकी अनेकांना याची कल्पनाही आहे. जर भाज्यांमध्ये केमिकलचा वापर केला असेल तर आपल्याला शरिराला काय हानी होईल हेदेखील वेगळं सांगण्याची गरज नाही. यादरम्यान सोशल मीडियावर भाजीविक्रेते केमिकलचा वापर करुन कशाप्रकारे भाज्या टवटवीत ठेवत ग्राहकांची फसवणूक करतात हे दाखवण्यात आलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
ट्विटरला एका युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. दोन मिनिटांच्या या व्हिडीओत एक व्यक्ती भाज्या बादलीत ठेवणयात आलेल्या केमिकलमध्ये बुडवताना दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे भाजी केमिकलमध्ये टाकण्यापूर्वी ती पूर्णपणे सुकलेली असते. पण केमिकलमधून बाहेर काढल्यानंतर ती एकदम टवटवीत फुलते. आताच ही भाजी शेतातून आणलेली असावी इतकी टवटवीत दिसू लागते.
हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून लोकांना धक्का बसला असून आश्चर्य व्यक्त करत आहेत.
रस्त्यांवर मिळणारं जंक फूड खाताना ते किती चांगलं आहे किंवा ते कशाप्रकारे तयार करण्यात आलं आहे, याबद्दल मनात अनेकदा शंका असते. पण आता सुदृढ आरोग्यासाठी गरजेच्या असणाऱ्या भाज्याही अशाप्रकारेच पिकवल्या जात असतील तर मग नेमकं खायचं काय? हा प्रश्न अनेकांना सतावत आहे.