याला गणिताची आवड पण कोणी संधीच दिला नाही... मग याने अशी हुशारी दाखवली...पाहा व्हिडीओ
जगभरात अशी अनेक वाहने आहेत, ज्यांच्यावर काही ना काही माहिती लिहलेले तुम्ही पाहिले असाल.
मुंबई : जगभरात अशी अनेक वाहने आहेत, ज्यांच्यावर काही ना काही माहिती लिहलेले तुम्ही पाहिले असाल. जसे तुम्ही टॅक्सी किंवा रिक्षावर पाहिले असेल की त्यावर काही तरी संदेश लिहिलेला असतो, तसेच मोठ्या ट्रकवरती देखील तुम्ही horn not okay please सारखे संदेश पाहिले असणार. त्यांपैकी काही संदेश आपल्याला समजतात तर काही आपल्याला विचारांच्या पलिकडे असतात.
अशाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, एका कारवरती 4x4 असे लिहिलेले.
कारवर गणिताचे सूत्र
सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून, कशाचाही विचार न करता एका व्यक्तीने कारवर लिहिलेल्या गणित्या सूत्राचे चॅलेंज स्वीकारले. रस्त्याच्या कडेला पार्क असलेल्या कारवर 4x4 असे लिहिलेले होते, ज्याचा अर्थ आहे ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टम.
पण त्या व्यक्तीला वाटले की, हा गणिताचा प्रश्न आहे, म्हणून त्याने गाडीवर 16 (= 16) लिहिले. म्हणजेच गुणाकाराचे सूत्र अंगिकारल्याने गाडीवर लिहिलेला प्रश्न सोडवला. हा व्हिडीओ तुम्ही एकदा पाहाच या व्यक्तीची हुशारी पाहून तुम्हाला तुमचे हसू आवरणार नाही आणि तुम्हाला त्या व्यक्तीला पाहून तुम्ही खोचक पणे म्हणाला हा बिचारा खूप हुशार आहे परंतु कदाचित याला योग्य संधी मिळाली नसावी.
4x4 काय म्हणजे काय?
ऑल-व्हील ड्राईव्ह सिस्टीम म्हणजे वाहनाचे चारही चाकं ड्रायव्हर एकाचवेळी फिरू शकतो. अशी वाहने डोंगर, चढणे, खडबडीत रस्त्यांसाठी सर्वोत्तम असतात. एवढेच नाही तर चालक या चाकाद्वारे गाडीवर उत्तम नियंत्रण ठेवू शकतो. हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी पंकज नैन यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्यानंतर लोकांनी यावर भरभरुन कमेंट्स केले आहे.