मुंबई : जर आपल्याला कोणत्याही गोष्टीचा कंटाळा आला किंवा समोरचा व्यक्ती आपलं ऐकत नसेल तर आपण त्याला सहज बोलून जातो की, तू खड्यात जा. परंतु आपल्याला मनात खरोखर त्या माणसाने खड्यात जावे किंवा पडावे अशी इच्छा नसते. परंतु तुम्ही भारतातील काही भागातील रस्त्यावरची परिस्थिती पाहाल तर ती खूपच भयानक आहे. ज्यामुळे लोकांवर खरोखर या खड्यात पडण्याची वेळ येते. काही वेळेला या खड्यांमुळे मोठे अपघात देखील होतात किंवा काही लोकांना त्यांचा जिव देखील गमवावा लागतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या रस्त्यांना तुम्ही पाहिलेच तर तुम्हाला हा प्रश्न तर नक्कीच पडेल की, नक्की रस्त्यात खड्डे आहे की, खड्ड्यात रस्ते आहे. इतकी याची अवस्था खराब झालेली असते. रस्त्यांची ही अशी अवस्था शक्यतो पावसामुळे होते. पावसामुळे रस्त्यावरील डांबर तर निघून जातो, परंतु त्या जागी पाणी साचून राहाते. त्यामुळे हा खड्डा किती मोठा किंवा खोल आहे, हे काही लोकांच्या लक्षात येत नाही.


सोशल मीडियावर असाच एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्याला पाहून तुम्हाला तुमचे हसू आवरणार नाही परंतु ही घटना अतिशय गंभीर आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका रस्त्यावर एक मोठा खड्डा आहे, ज्यात पावसाचे पाणी साचले आहे.


तेवढ्यात तेथे एक बाईक, येते ज्यावर दोन व्यक्ती बसलेले असतात. बाईक चालाक त्याची बाईक या खड्यातुन घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो आधी खड्ड्यात तर उतरतो परंतु जेव्हा बाहेर येण्याची वेळ येते तेव्हा मात्र त्याचा तोल बिघडतो आणि बाईक आडवी होते, त्यावेळेस बाईक चालक तर स्वत:ला पाण्यात पडण्यापासून वाचवू शकला, परंतु त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीचा तोल मात्र जातो आणि तो संपूर्ण चिखलाच्या पाण्यातून न्हाऊन निघतो.


हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यातून हसून हसून पाणी आल्याशिवाय रहाणार नाही. परंतु कितीही मजेदार हा व्हिडीओ असला तरी वाहव चालकांनो या घटनेकडे उदाहरण म्हणून पाहा आणि मोठ्या अपघातापासून स्वत:चे रक्षण करा.



या व्हिडीओला carlovers_04 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलं आहे, या व्हिडीओला अपलोड करताच यावर लोकांच्या कमेंट्सचा पाऊस पडला आहे.