कोरोनात लुटणाऱ्यांना आरजेचा इशारा...ही लूट लक्षात ठेवा, आणि ही लूट लक्षात ठेवली जाईल
जास्त किंमतीत जीवनावश्यक वस्तूंची विक्री करुन गरजू लोकांना लुटत आहेत. यावर आरजे राघवने कोरोना काळात लोकांना लुटणाऱ्या लोकांवर निशाना साधला आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसच्या दुसर्या लाटेमुळे संपूर्ण देशभरात कोरोना बधितांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे. त्यामुळे रुग्णांना रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाहीत, तर कधी ऑक्सिजन मिळत नाही. कुठे मृत्यू नंतर स्मशानभूमीत लाकूड उप्लब्ध नाही. ऑक्सिजन आणि रुग्णालयांमध्ये बेडच्या अभावामुळे संपूर्ण देशात आपत्कालीन स्थिती आहे. अशा परिस्थितीचा काही लोकं फायदा घेत आहेत. आणि जास्त किंमतीत जीवनावश्यक वस्तूंची विक्री करुन गरजू लोकांना लुटत आहेत. यावर आरजे राघवने कोरोना काळात लोकांना लुटणाऱ्या लोकांवर निशाना साधला आहे.
कोरोना युगात, जिथे लोकांना ऑक्सिजन आणि अगदी रुग्णालयात बेडही मिळू शकत नाहीत. तर कुठे रुग्णवाहिकेची प्रतीक्षा करत असताना, बरेच रुग्ण आपला जीव गमावत आहेत. यातचं बरेच लोकं एकमेकांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. तर दुसरीकडे असे चित्र आहे की, काही लोकं या परिस्थितीचा फायदा उचलून लोकांची लूट करत आहेत, हे असे लोकं गरजू लोकांकडून हवा तसा मोबदला मागत आहेत.
काही किलोमीटरच्या प्रवासासाठी रुग्णवाहिका हजारो रुपये घेत आहेत, तर रेमडेसिवीरच्या इंजेक्शन्सचा काळा बाजार सुरु आहे. लॉकडाऊनमुळे बर्याच ठिकाणी फळे आणि भाजीपाल्यांचे दरही वाढले आहेत. त्यामुळे लोकांकडून अशा प्रकारे पैसे लूटणाऱ्या लोकांवर निशाना साधत 104.8 एफएमच्या आरजे राघवने एक व्हिडीओ शेअर केला आहे.
आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये राघव म्हणत आहे की, "या आपत्तीच्या काळात काळाबाजार करणार्या लोकांचा देखील हिशेब होईल. वेळ कितीही वाईट असो. पण अशा लोकांचा चांगला काळ येणार नाही."
सोशल मीडियावर लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. लोकं आरजे राघवला खूप सपोर्ट करत आहेत. लोकं हा व्हिडीओ फक्त एकमेकांना नुसतं शेअरच करत नाहीत तर, त्यावर कमेन्टंस देखील करत आहेत. बर्याच लोकांनी राघव यांचे समर्थन केले आणि सांगितले की, सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टींचा हिशेब त्यांना देण्यात येईल.