मुंबई : सोशल मीडिया हा व्हिडीओंचा भंडार आहे. येथे तुम्हाला नेहमीच असं काहीतरी मिळले. जे तुमचं मनोरंजन करेल. येथे तुम्हाला कॉमेडी, लाईफस्टाईल, सायन्स फिक्शन सारखे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. त्यात आता एक असा व्हिडीओ सर्वासमोर आला आहे. ज्याची सोशल मीडियावर एकच चर्चा होत आहे. व्हायरल होणारा हा व्हिडीओ पेट्रोलपंप वरचा आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती रस्त्यावर पडलेली नोट उचण्यासाठी अनोखी युक्ती लावतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका पेट्रोल पंप कर्मचाऱ्याच्या हातातून पैसे खाली पडतात. जे त्याच्या लक्षात येत नाही. तितक्या स्कूटी घेऊन एक तरुण तेथे येतो, जो रस्त्यावरची नोट पाहून पटक तेथे गाडी थांबवतो आणि नोटीवरती पाय ठेवतो. ज्यानंतर तेथे पेट्रोल पंप कर्माचारी येतात. ज्यांना काहीतरी सांगून हा तरुण पलटवून लावतो.


याच संधीचा फायदा घेऊन हा तरुण स्कुटी खाली उतरतो आणि पायाला काय लागलंय असं एक्ट करतो. हे सगळं नाटक करत असताना तो पटकन आपल्या पायाखालची नोट काढतो आणि खिशात भरुन निघून जातो.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


ही घटना कुठची आहे, याची माहिती समोर आलेली नाही. परंतु या तरुणाने जी काही युक्ती वापरली आहे, त्याला कशाचीही तोड नाही हे मात्र नक्की.


हा व्हिडीओ bhutni_ke_memes या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. युजर्स या तरुणाच्या युक्तीची तोंड भरुन चर्चा करत आहेत.