shocking king cobra: सापाचं नुसतं नाव जरी काढलं तरी आपल्याला घाम फुटतो. त्याला कारणही तसंच आहे. साप जरी हात पाय नसलेला सरपटत चालणार जीव असला तरी त्याचा एक दंश आपल्याला स्वर्गात पोहचवण्यासाठी पुरेसा असतो.   
सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात. यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media)  लोकांकडून असे व्हिडीओ खूप आवडीने पाहतात आणि शेअर सुद्धा करतात. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि शेअरसुद्धा होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सापाचं नाव जरी काढलं तरी आपली भंबेरी उडते.पण काहीजण याच भयंकर सापांसोबत असे काही वावरतात कि काय बोलावं ?. तसं पाहिलं तर आपण सापांचे असे अनेक व्हिडीओ  याआधी सोशल मीडियावर पाहिले असतीलच . (snake video viral)


त्यात भर म्हणून , नुकताच एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून सुरवातीला तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. मात्र नंतर तुम्हाला कौतुकसुद्धा वाटू लागेल.  (viral king cobra shampoo bath shocking video )


व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता एक व्यक्ती चक्क महाकाय सापाला अगदी प्रेमाने शाम्पू लावून लहान मुलांना अंघोळ घालावी तशी मजा सुरु आहे . हा साप साधा-सुधा साप नाहीये. जगातील सर्वात विषारी खतरनाक महाकाय किंग कोब्रा (king cobra video viral) आहे. साप सुद्धा अंघोळीची आणि मुख्यतः शाम्पूची मज्जा घेतोय. 



अंगावर शहारे आणणारा हा थरारक व्हिडीओ @DPrasanthNair नावाच्या युजरने सोशल मीडियावर शेअर केलाय. 45 सेकंदाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारोंच्या संख्येत व्यूज आले आहेत.   युजरने कॅप्शनमध्ये म्हटलं, साप आणि माणसामध्ये असलेली बॉन्डिंग पाहा, एक तरुण या सापाची लहान मुलासारखी आंघोळ घालताना दिसत आहे.हा व्हिडीओ ज्यांनी कुणी पाहिला असेल, त्यांना सुरवातीला धक्का बसल्याशिवाय राहिला नसेल.


या व्हिडिओवर आता सोशल मीडियावर इतके कॉमेंट्स येत आहेत कि वाचून आपल्याला सुद्धा हसू आवरणार नाही. (viral king cobra shampoo bath video)