मुंबई : सोशल मीडियावर एक अतिशय लाजिरवाणा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका शाळेचा आहे, जिथे एक महिला शिक्षिका पूर्ण वर्गात झोपलेली दिसत आहे. त्यावेळा बाजूला मुले वर्गात बसलेली दिसत आहेत. परंतु ही महिला शिक्षिका एवढ्यावरच थांबली नाही, तर तिने एका मुलीला कामाला देखील लावलं आणि आपल्याला हवा घालायला सांगितलं. हे प्रकरण फारच चीड आणणारा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर कोणीतरी हा व्हिडीओ शेअर केला, जो आता सर्वत्र वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.


शिक्षक हे पद खूप मानाचं आणि महत्वाचं पद आहे. त्यांच्या हातात मुलं घडतात जी मोठी होऊन एखाद्या मोठ्या पोस्टवर कामाला लागतात. परंतु शिक्षकच असे वागू लागले, तर मुलांवर संस्कार कसे घडणार हा मोठा प्रश्न उपस्थीत झाला आहे.


हा व्हिडीओ व्हायरल होताच, महिला शिक्षिकेला या संदर्भात विचारण्यात आले, तेव्हा ती खोटं बोलू लागली. मी ती नाहीच आणि मी असं केलेलं नाही, कोणीतरी माझ्या बदनामीसाठी असं करत असल्याचं शिक्षिकेचं म्हणणं आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

=


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ बिहारमधील एका सरकारी शाळेचा आहे. वर्गात मुले जमिनीवर बसलेली दिसतात. जवळच एक खुर्ची ठेवली आहे. महिला शिक्षिका खुर्चीवर बसलेली आहे. त्याचवेळी शेजारी एक मुलगी उभी असलेली दिसली. नीट पाहिल्यावर लक्षात येईल की महिला शिक्षिका वर्गात खुर्चीवर बसून शांत झोपली आहे. ती अशी काही झोपली आहे की, तिला कसलंच टेन्शन नाही.


सोशल मीडियावर हा व्हिडीओ baatbiharki या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्यावर लोक जोरदार कमेंट्स करत आहेत. मुलांचं भविष्य अंधारात ठेवून ही महिला शिक्षिका झोपली असल्याचं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. तर एका यूजरने व्हिडीओ पाहून टोमणा मारला की, 'शिकवण्यासाठी इतकी मेहनत लागते?'