मुंबई : सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ भावनिक असतात, ते पाहून डोळ्यात अश्रू येतात, तर काही व्हिडीओ इतके मजेदार असतात की, ते दर्शकांना खूप हसवतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला तुमचं हसू थांबवता येणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमधील डीजे वाल्या बाबूंने या मुलींची अशा प्रकारे फजिती केली की, त्यामुली डान्स करायला विसरल्या.


'डीजे वाले बाबू मेरा गाना चला दो', प्रसिद्ध भारतीय रॅपर बादशाहचे हे गाणे प्रत्येकाच्या तोंडत असते. परंतु या डीजे वाल्याने या दोन्ही मुलींच्या बाबतीत जे केलं ते पाहून, या मुली 'डीजे वाले बाबू मेरा गाना चला दो' हे कधीही बोलणार नाहीत.


हा व्हिडीओ खरोखर मजेदार आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये, दोन मुली स्टेजवर नाचत आहेत, पण त्यांनी नाचायला सुरुवात करताच डीजेने त्या गाण्याला त्याच ठिकाणी थांबवून ठेऊन ते गाणं रीपिर्ट केलं, ज्यामुळे त्यामुली पुढे नाचू शकत नव्हत्या.


यामुलींना वाटलं आता गाणं पुढे जाईल, नंतर जाईल परंतु डीजे वाल्याने ते गाणं त्याच शब्दावर थांबवून ठेवलं आणि त्या शब्दाला तो रीपिर्ट करत राहिला, ज्यामुळे या मुलींना नाचता आलं नाही आणि त्यांची सगळ्या लोकांसमोर फजेती झाली.


हा मजेदार व्हिडीओ rvcjinsta नावाच्या इन्स्टाग्राम आकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. लोक या व्हिडीओवर जोरदार कमेंट करत आहेत, ऐवढेच काय तर या व्हिडीओमधील या मुलींच्या या परिस्थितीचा लोकांनी मीम्स देखील बनवला आहे. डीजेचा हा खोडकरपणा आणि मुलींची फजेती पाहिल्यानंतर लोकांचे हसणे थांबतच नाही.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


या दोन्ही गरीब मुली डीजेच्या या वागण्यामुळे नाचण्यास असमर्थ झाल्या. लोक फक्त हा व्हिडीओ शेअर करत नाहीत, तर त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देखील देत आहेत.