मुंबई : प्रत्येक लग्नाच्या पद्धती या वेगळ्या असतात. परंतु कोणत्याही पद्धती किंवा जाती धर्मातील लग्न असले तरी, लग्न म्हटलं की, मजा, मस्करी या सगळ्या गोष्टी येतात. सध्या सोशल मीडियावरती आपल्याला असे लग्नातील अनेक व्हिडीओ पाहायला मिळत आहे. जे खूप व्हायरल होत आहे. तुम्ही आतापर्यंत हिंदू धर्मातील लग्न आणि परंपरेचा व्हिडीओ पाहिला असेल. पण आता जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तो ख्रिश्चन धर्माचा आहे. या लग्नात वधू आणि वर अतिशय सुंदर ड्रेसमध्ये दिसत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वधूने एक सुंदर पांढरा गाऊन घातला आहे, तर नवरदेव हा पश्चिमी लुकसह सुट-बुटमध्ये दिसत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये हे पाहिले जाऊ शकते की, लग्नानंतर जेव्हा सर्वांसमोर नवरदेव आपल्या वधूची किस्स घेतो तेव्हा तो बेशुद्ध होतो आणि मागे पडतो. या दरम्यान, मागे उभे असलेले मित्र त्याला पकडतात आणि त्याला उचलतात.


नवरदेवाने किस्स केल्यानंतर त्याच्यासोबत असे काही घडेल याची कल्पना नववधूला नव्हती, त्यामुळे जेव्हा नवरदेव किस्स करुन मागे पडतो तेव्हा काही क्षणासाठी नववधूला काही कळत नाही. परंतु जेव्हा नवरदेवाचे मित्र त्याला उचलतात तेव्हा सगळे हसायला लागतात, ज्यामुळे मग नववधूला हा सगळा प्रकार कळतो आणि ती देखील हसू लागते.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


नववधूच्या मागे उभ्या असलेल्या तिच्या मैत्रिणी देखील हे सगळ पाहून जोरजोरात हसायला लागतात. लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. इन्स्टाग्रामवर सुमारे 90 हजार लोकांनी या व्हिडीओ लाईक केले आहे. प्यार रोमान्स वाला नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटने हा व्हिडीओ शेअर केला आहे.