नववधूच्या गळ्यात हार घालताच नवरदेवाचा ताबा सुटला! सर्वांसमोर करू लागला असे कृत्य
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की वधू आणि वर स्टेजवर उभे आहेत. तेथे त्या दोघांच्याही हातात वरमाला आहेत.
मुंबई : सध्या भारतात लग्नाचा सिझन सुरू आहे. त्यामुळे यासंबंधीत अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. लग्नात वधू-वरांचे काही असे क्षण कॅमेरात टिपले जातात, जे त्यांना नेहमी लक्षात राहातील. असाच एका लग्नाती व्हिडीओ समोर आला आहे. जो सध्या सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड होत आहे. हा व्हिडीओ तसा बराच जुना आहे, परंतु हा आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर तो व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ वधू-वर आणि त्यांच्या वरमाला कार्यक्रमाशी संबंधित आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की वधू आणि वर स्टेजवर उभे आहेत. तेथे त्या दोघांच्याही हातात वरमाला आहेत, ज्या त्या एकमेकांच्या गळ्यात घालणार असतात. पुढे, वधू नवरदेवाला वरमाला घालते, परंतु नवरदेव नववधूला वरमाला घालण्यासाठी थांबलेला असतो.
तेव्हाच व्हिडीओमधील सर्वात मजेदार गोष्ट घडते. वराने आपल्या वधूला वरमाला घालताच, त्याचं स्वत:वर नियंत्रण राहात नाही आणि तो वेड्यासारखा सर्वांसोमर नाचू लागतो.
तसे पाहाता हा वरमाला घालण्याचा समारंभ खूपच मजेदार असतो, परंतु या व्हिडीओमधील वरमाला सोहळा हा भलताच हिट ठरला. यासाठी कारणीभूत आहे, तो म्हणजे नवरदेव
नवरदेव आपल्या लग्नात इतका आनंदी दिसत आहे की, तुम्ही त्याचं वागणू पाहून नक्कीच म्हणाल, 'उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग.' कारण नववधूला हार घातल्यानंतर त्याने ज्या प्रकारे आपला आनंद व्यक्त केला आहे, ही घटना ती नववधू देखील कधीही आयुष्यात विसरणार नाही.
34 सेकंदांचा हा व्हिडीओ इतका मजेदार आणि मजेशीर आहे की, तो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. जोडीदार मिळाल्याने रोमांचित झालेला नवरा लग्नाला आलेल्या पाहुण्यांचीही पर्वा करत नाही आणि स्टेजवरच आपला उत्साह दाखवत आहे.