Pressure Cooker Blast : जेवण बनवण्यासाठी प्रत्येक घरात प्रेशर कुकरचा वापर हमकास होतो. जेवण बनवताना प्रेशर कुकरमधील (Pressure Cooker) वाफ घालवण्यासाठी शिटी काढली जाते. प्रेशर कुकरमध्ये जेवण बनवणं जितकं सोप आहे, तितकाच तो धोकायकही आहे. जेवण बनवताना प्रेशर कुकरचा स्फोट झाल्याच्या अनेक घटना आहेत. यात संपूर्ण घराचं नुकसान तर होतंच पण अनेक घटनांमध्ये जिवीतहानी देखील झाल्याची उदाहरणं आहेत. अशाच एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. वाफ बाहेर जाऊ न देताच एक व्यक्ती जबरदस्तीने प्रेशर कुकर उघडण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अंगाचा थरकाप उडतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जबरस्तीने कुकर उघडण्याचा प्रयत्न
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती गॅसवरुन नुकताच उतरवलेला प्रेशर कुकर जबरदस्ती उघडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. या व्यक्तीच्या आजुबाजूला काही लोकही बसलेले दिसतायत. वाप बाहेर जाऊ देताच एक व्यक्ती ताकद लावून प्रेशर कुकर उघडतोय, पण याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतात. प्रेशर कुकरचं झाकण उघडताच मोठा स्फोट झाला. यात त्या व्यक्तीसह आजूबाजूला बसलेली लोकंही गंभीर जखमी झाले. 


या स्फोटात जिवीतहानी झाली की नाही, याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. पण व्हिडिओत स्फोटाची तीव्रता पाहाता घराचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असणार याचा अंदाज लावला जाऊ शकतो.


व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत प्रेशर कुकरचा स्फोट झाल्यानंतर व्हिडिओ बंद होतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. 



व्हिडिओवर कमेंट्स
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. असा मुर्खपणा करण्याआधी दहावेळा विचार करायला हवा अशी प्रतिक्रिया एका युजर्सने दिलीय. तर युजरने म्हटलंय, व्हिडिओ पाहून ही लोकं अनेक दिवसांपासून उपाशी असल्याचं वाटतंय, यांना प्रेशर कुकरमधली वाप बाहेर न जाऊ देण्याइतपतही वाट पाहता आली नाही. हा व्हिडिओ घाई करणाऱ्या लोकांसाठी एक धडा असल्याचं म्हटलंय. 


जेवण बनवून झाल्यानंतर प्रेशर कुकर उघडताना त्यातली वाफ पूर्णपणे जाऊ देणं गरजेचं आहे. प्रेशर कुकरचा व्हॉल्व्ह काळजीपूर्वक उघडा अन्यथा असा धोकादायक प्रकार घडू शकतो.