Viral Video : चालती ट्रेन पकडताना तोल गेला आणि प्लॅटफॉर्म-ट्रेनदरम्यान अडकला प्रवासी
Train Viral Video : धावती ट्रेन पकडतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (viral on social media) होतो आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही थक्कं व्हाल.
Social Viral Video : आपल्याला अनेक वेळा सांगितलं जातं की धावती ट्रेन पकडू नका, पण लोकांना कितीही सांगितलं तरी ते काही ऐकतं नाही. सोशल मीडियावर आपण धावती ट्रेन पडकताना झालेले अपघाताचे अनेक व्हिडीओ पाहिले आहेत. तरीही लोकं लवकर पोहोचण्यासाठी जीवाची परवा न करता धावती ट्रेन पकडतात. धावती ट्रेन पकडतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (viral on social media) होतो आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही थक्कं व्हाल.
धावती ट्रेन पडकताना तोल गेला अन्...
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, चालत्या ट्रेनमध्ये चढताना एका प्रवाशाचा तोल गेला आणि तो खाली पडला. प्रवासी धावती ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये पडला. ही धक्कादायक घटना पाहून अंगावर काटा येतो. चालती ट्रेन पकडण्याचा नादात प्रवाशाने आपला जीव धोक्यात घातला. तो प्रवाशी ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकला. प्रवासी व्यक्ती काही काळ ट्रेनसोबत खेचत गेला पण एका आरपीएफ (RPF Jawan) जवानाच्या प्रसंगावधानामुळे त्याचा जीव वाचला. या घटनेचा CCTV फुटेज समोर आलंय. आहेत ज्यामध्ये ही घटना स्पष्टपणे दिसून येत आहे. (Viral Video Passenger Falls Gap Between Moving Train and Platform nmp)
चमत्कारिकरित्या वाचला प्रवाशाचा जीव
हा जीवन आणि मृत्यूचा थराराचा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) आहे. ही घटना 6 नोव्हेंबर रोजी बस्ती रेल्वे स्थानकावर घडली. आरपीएफ जवान अमित शुक्ला (Amit Shukla) ताबडतोब प्रवाशाला वाचवण्यासाठी येतो. तो मोटरमनला ट्रेन थांबवायला लावतो आणि प्रवाशाला बाहेर काढण्यात येतो. या दुर्घटनेत प्रवासी थोडक्यात वाचला आहे. तो किरकोळ जखमी झाला आहे.