मुंबई : जेव्हा आपण बँकेतून पैसे काढून घेतो किंवा कोणत्याही व्यक्तीकडून पैसे घेतो तेव्हा शक्य तो आपण ते मोजुन घेतो. पंरतु जर आपण पैशांचे बंडल पाहिले तर आपण ते मोजत नाही. कारण ते बंडल चारही बाजूने अशा  प्रकारे बंद केलेलं असते की, त्यातून कोणीही पैसे काढू शकणार नाही. त्यामुळे त्यात नोट कमी असेल असा आपण विचार देखील करत नसणार. परंतु अशा सील बंडलमधून देखील पैसे काढले जाऊ शकतात आणि हे खरे आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पैशांचा बंडल जरी पॅक असला तरी त्यामधून पैसे काढणे शक्य आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, त्यामध्ये नोटांच्या बंद बंडलमधून काही नोट्स कसे काढले जातात हे दाखवले आहे. हे पैसे अशा प्रकारे हातचलाकी करुन काढले जातात की, तुम्हाला त्याचा पत्ताच लागणार नाही. यावर हे माहित करुन घेण्याचा एकच पर्याय आहे तो म्हणजे पैसे मोजुन घेणे.


38 सेकंदाच्या या व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्ही हातात नोटांचा बंडल आणि पेन घेतलेला हा माणूस पाहू शकता. पंजाबी भाषेत बोलताना तो सांगत आहेत की, जेव्हा आपण सर्वजण बँकेतून नोटांचे गठ्ठा काढून घेतो, मग त्यावर शिक्कामोर्तब पाहून आपल्याला असे वाटते की, यामधील पैसे पूर्ण आहेत.


परंतु एका पेनच्या मदतीने ती व्यक्ती त्या बंडलचे सील न उघडता बॉक्समधून नोट काढण्याची युक्ती सांगते. जे पाहून लोकं हैराण झाले आहेत.


हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी रूपिन शर्मा यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, 'कृपया नोटांच्या बंडलमधील नोटा मोजुन घ्या. या सोप्या युक्तीचा वापर करून लोकं त्यातून काही नोट काढू शकतात.'



आतापर्यंत 1 हजाराहून अधिक वेळा हा व्हिडिओ पाहिला गेला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, लोकांचे डोळे उघडले आहेत. कारण अशा पद्धती पैसे काढले जाऊ शकतात हे कोणाच्याही लक्षात आले नाही.