मुंबई : कोरोनाचा (Corona) संसर्ग साऱ्या जगभरात थैमान घालताना दिसला आणि पाहता पाहचा काही निर्बंधांनी दैनंदिन जीवनशैलीत कायमचं स्थान मिळवलं. यामध्ये काही गोष्टी सवयीचाच भाग ठरल्या तर, काही गोष्टींकडे निर्बंध म्हणून पाहिलं गेलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मग सुरुवात झाली, या निर्बंधांच्या बंधनातून मुक्त होण्याची. कोरोनाच्या धर्तीवर लागू करण्यात आलेल्या अशा निर्बंधांपैकी एक म्हणजे मास्क लावण्याची सक्ती. कोरोना संसर्गाची शक्यता कमी करण्यासाठी आणि त्यापासून बचाव व्हावा यासाठी या निर्बंधांचं पालन करण्याचं आवाहन सर्व आरोग्य संघटनांकडून देण्यात आला आहे. 


इथं अनेकजण मास्कला (Mask) तिलांजली देताना दिसत आहेत, तर काहीजण मात्र मास्कचा वापर न विसरता करत आहेत. स्वत:च्या आणि इतरांच्या आरोग्याची काळजी घेत मास्कचा वापर करणाऱ्या अशाच मंडळींमध्ये आता चक्क एका माकडाचाही समावेश झाला आहे. जो मास्क न वापरणाऱ्यांना आपल्या कृतीतून चांगलीच चपराक लगावत आहे. 




सोशल मीडियावर एक व्हिडीओ काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक माकड दाखवत असलेली हुशारी पाहून त्याचंही कौतुक होत आहे. Rex Chapman नावाच्या एका ट्विटर अकाऊंटवरुन 27 सेकंदांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये माकडला रस्त्यावर पडलेला एक मास्क सापडतो, तो मास्क दिसताच माकड ते तोंडावर लावतो. काही पावलं चालल्यावर माकडाच्या तोंडावरील मास्क खाली पडतो, ज्यानंतर तो पुन्हा उचलून मास्क तोंडावर लावतो. हा व्हिडीओ पाहत असताना एका प्राण्याची हुशारी सर्वाचंच मन जिंक आहे तर, दुसरीकडे नियमांचं उल्लंघन करणाऱ्या अनेक माणसांसाठी धडाही शिकवून जात आहे.