नवी दिल्ली: तिन्ही संरक्षण दलाचे संरक्षण प्रमुख बिपीन रावत हेलिकॉप्टर अपघातात शहीद झाले आहेत. तमिळनाडुमधल्या कुन्नूर इथे वायुसेनेच्या MI-17V5 हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या अपघातामध्ये बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीसह 11 जणांचा अपघाती मृत्यू झाला. कुन्नूरमधल्या जंगल भागात या हेलिकॉप्टरचा अपघात झाला.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

CDS बिपीन रावत यांचं पार्थिव आज संध्याकाळी 7.45 वाजण्याच्या सुमारास पालम विमातळावर दाखल झालं. यावेळी पाणवलेल्या डोळ्यांनी सैन्य दलातील वरिष्ठ आणि जवानांसह नेत्यांनी रावत यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. 



सोशल मीडियावरही वेगवेगळ्या पद्धतीनं CDS बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. ट्वीटरवर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पिंपळाच्या पानावर बिपीन रावत यांचा फोटोचं कोरीव काम करून अनोख्या पद्धतीनं श्रद्धांजली अर्पण केली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 


सोशल मीडियावर अनेक युजर्सनी हा व्हिडीओ शेअर करत तिन्ही संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावत यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार आहेत. 


रात्री 9 वाजता पंतप्रधान मोदी पालम विमानतळावर पोहोचतील आणि हेलिकॉप्टर अपघातात निधन झालेल्या सर्वांना आदरांजली वाहतील. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि तीन्ही सैन्यदलप्रमुख यावेळी उपस्थित असतील. 


श्रीलंका, नेपाळ आणि भूतानचे वरिष्ठ लष्करी अधिकारी जनरल बिपिन रावत यांच्या उद्या होणा-या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत.