Stunt Viral Video: गेल्या काही दिवसात जगाची पर्वा न करता बाईकवर बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडच्या रोमान्सचे (Romance) अनेक व्हिडिओ (Viral video) व्हायरल झाले. मुंबई, दिल्ली, बंगळुरु अशा मोठ्या शहरात धावत्या बाईकवर बॉयफ्रेंडच्या समोर बसून रोमान्स करतानाचे व्हिडिओ आपण पाहिले असतील. या घटनांमध्ये काहीवेळी त्या कपलविरोधात पोलिस स्थानकात गुन्हाही दाखल झाला आहे. सध्या सोशल मीडियावर (Social Media) असाच एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. पण हा व्हिडिओ पाहून युजर्स गोंधळात पडले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे व्हायरल व्हिडिओत?
व्हायरल होणारा हा व्हिडिओ बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडचा नाही तर दोन मुलींचा आहे. धावत्या बाईकवर दोन मुली एकमेकांसमोर बसलेल्या दिसत असून कोणतीही भीती न बाळगात रोमँटिक अंदाजात स्टंट (Stunt on Moving Bike) करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा आहे हे कळू शकलेलं नाही. पण हा व्हिडिओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक मुलगी बाईकच्या पेट्रोल टाकीवर उलट्या दिशेने बसली आहे. तर दुसरी मुलगी बाईकच्या सीटवर तिच्या समोर बसली आहे. 


व्हिडिओच्या सुरुवातीला या दोनही मुली एकमेकांना टाळ्या देताना दिसतायत, त्यानंतर दोघी एकमेकां किस करतात आणि नंतर मिठी मारताना दिसतायत. धावत्या बाईकवर दोघी हा स्टंट करताना दिसत असून त्यांनी बाईकचं हँडलही धरलेलं नाही. दुसऱ्या बाईकवर हा स्टंट कुणतरी मोबाईलवर शूट केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 


व्हायरल होणारा हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. स्टार्स ऑफ झारखंड या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी या मुलींचं कृत्यावर संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी हा व्हिडिओ झारखंड पोलिसांना टॅग करण्याचा सल्ला दिला आहे. तर काहींनी गमतीने म्हणून आम्ही सिंगलच राहिलो आहे, असं म्हटलं आहे. 



बाईकवर रोमान्सचा व्हिडिओ
काही दिवसांपूर्वी छत्तीसगडच्या भिलाई येथे धावत्या बाईकवर रोमान्स करणाऱ्या एका जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. पण असं करणं या प्रेमी युगुलाला चांगलंच महागात पडलं होतं.  सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरुकेला आणि या दोघांचा शोध घेत त्यांना बेड्या ठोकल्या.चाकीवर उलट्या दिशेला तोंड करुन बसलेली मुलगी तरुणाला किस करताना व्हिडीओत दिसत होती.