Viral Video : एखाद्या चांगल्या रेस्तराँमध्ये जेवायला गेल्यानंतर बऱ्याचदा तिथं ग्राहकांनी ऑर्डर केलेले पदार्थ वेटर पानात वाढून देतात. बरं, हॉटेलला आलोच आहोत तर, रोजचं खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं खाऊया... असंच अनेकांचं मत असतं. सरतेशेवटी हेच मत जिंकतं आणि चांगलेचुंगले पदार्थ माहवले जातात. पण, समजा एखाद्या व्यक्तीनं शाकाहारी जेवण मागवलं आणि त्याच्या पानात मांसाहारी पदार्थ वाढला गेला तर? धक्का बसेल ना? असाच एक प्रकार मेरठमध्ये घडला असून, या ठिकाणचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशातील मेरठमधील रोमियोलेन नावाच्या एका फाईन डाईन रेस्तराँमध्ये एक कुटुंब जेवण्यासाठी पोहोचलं होतं. इथं त्यांनी शाकाराही पदार्थ मागवले. पण, त्यांना प्रत्यक्षात मात्र मांसाहारी जेवण वाढण्यात आलं. बरं, हा पदार्थ नेमका काय आहे हे जाणून न घेताच या मंडळींनी तो पोटभर खाल्ला तोपर्यंत सर्वकाही ठीक. पण, ज्यावेळी टेबलावर जेवणाचं बिल आलं, तेव्हा मात्र त्यात शाकाहारी पदार्थांऐवजी मांसाहारी पदार्थांचे दर लावल्याचं पाहून या मंडळींचं डोकं चक्रावलं. 


हेसुद्धा वाचा : धनाढ्य मुकेश अंबानींना काढावं लागतंय  ₹255000000000 चं कर्ज? इतकी श्रीमंती असतानाही का आली ही वेळ? 


ही कोणतीही चूक नसून, प्रत्यक्षात असंच घडल्यालं त्यांना सांगण्यात आलं आणि या कुटुंबानं हॉटेलमध्येच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या कुटुंबीयांनी वेटर, शेफ आणि हॉटेल मालकांना खडे बोल सुनावले. आपण, चुकून मांसाहारी पदार्थ दिल्याची कबुली शेफनंही देताच या मंडळींच्या त्रागा आणखी वाढला. सोशल मीडियावर घटनास्थळाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. 



आश्चर्याची बाब म्हणजे तिथं हॉटेलमधील वेटर, शेफ आणि मालकांपेक्षा जास्त रोष तर या कुटुंबीयांनीच ओढावला. इतकं खाऊनपिऊन तो पदार्थ शाकाहारी नाही हे यांच्या लक्षात कसं नाही आलं? हाच प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. तर, काहींनी हॉटेलमधील सर्वरचं नाव सुल्तान असल्याचा मुद्दा उचलून धरत या प्रकरणाला दुसरंच वळण देण्याचा प्रयत्न केला.