धनाढ्य मुकेश अंबानींना काढावं लागतंय ₹255000000000 चं कर्ज? इतकी श्रीमंती असतानाही का आली ही वेळ?

Mukesh Ambanis Debt : श्रीमंती असतानाही मुकेश अंबानींच्या कंपन्यांवर इतकं मोठं कर्ज? फेडण्यासाठी नव्या वर्षात अंबानी उलचलणार मोठं पाऊल...   

सायली पाटील | Updated: Dec 10, 2024, 01:10 PM IST
धनाढ्य मुकेश अंबानींना काढावं लागतंय  ₹255000000000 चं कर्ज? इतकी श्रीमंती असतानाही का आली ही वेळ?  title=
Mukesh Ambanis reliance foundation seeks 255000000000 rupees Debt know details

Mukesh Ambanis Debt : रिलायन्स उद्योगसमुहाचे सर्वेसर्वा आणि आशियातील सर्वात धनाढ्य व्यक्ती अशी ओळख असणाऱ्या मुकेश अंबानी यांनी व्यवसाय क्षेत्रात कमालीचं यश संपादन केलं. आश्चर्याची बाब म्हणजे जागतिक स्तरावरही त्यांनी नावलौकिक मिळवलं. इतकी श्रीमंती असणाऱ्या व्यक्तीला पैशांची कसलीच कमतरता नाही, असाच अनेकांचा समज. पण, प्रत्यक्षात मात्र वस्तूस्थिती वेगळी आहे. कारण, खुद्द मुकेश अंबानी यांनाही कर्जाची आणि वाढीव पैशांची गरज भासली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार अंबानी येत्या काळात कर्ज स्वरुपात मोठ्या रकमेची उचल करणार असून, त्यांना साधारण 3 अब्ज  डॉलर इतक्या रकमेच्या कर्जाची गरज असल्याचं म्हटलं जात आहे. जवळपास बहुसंख्य बँकांशी त्यांनी यासंदर्भात संपर्क साधण्यास सुरुवात केली असून, रिलायन्सला आपल्यावर असणारा कर्जाचा भार कमी करण्यासाठी नव्यानं हे कर्ज काढावं लागत असल्याची माहिती समोर आली आहे. 

ब्लूमबर्गच्या माहितीनुसार 2025 या नव्या वर्षामध्ये मुकेश अंबानी त्यांच्यावर असणाऱ्या कर्जाचा भार कमी करण्यासाठी महत्त्वाची पावलं उचलण्याच्या तयारीत असून, जुनं कर्ज फेडण्यासाठी ते नव्यानं कर्ज घेण्याचा मार्ग अवलंबणार असल्याचं सांगितलं जात आहे. 2025 मध्ये अनेक कर्जांची मुदत संपत असून, त्यामुळं ही कर्ज फेडण्यासाठी म्हणून रिलायन्सकडून हे प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. 

हेसुद्धा वाचा : HR आहे की... मेलवरून कर्मचाऱ्यांना ताण येतोय का? विचारत दिला नारळ; आपुलकीच्या मुखवट्याआडून केला घात 

प्राथमिक वृत्तानुसार ही सर्व कर्ज फेडण्यासाठी तब्बल 3 अब्ज डॉलर म्हणजेच 25500 कोटी रुपयांची आवश्यकता असल्यामुळं आता रिलायन्स एक मोठा व्यवहार करणार असल्याची चिन्हं आहेत. सध्याच्या घडीला रिलायन्स इंडस्ट्रीजकडून प्रामुख्यानं 6 महत्त्वाच्या बँकांशी सदर कर्जासाठी संपर्क साधला जात आहे. सध्याच्या घडीला रिलायन्स समुहावर 2.9 अब्ज डॉलर इतकं कर्ज असून, 2023 मध्येही कंपनीनं 8 अब्ज डॉलर इतक्या रकमेचं कर्ज घेतलं होतं. रिलायन्स जिओ आणि इतर सहकारी कंपन्यांसाठीच्या या कर्जाकरता जवळपास 55 बँकांमधून आर्थिक पाठबळ मिळवण्यात आलं होतं. 

शेअर बाजारात कंपनीची काय स्थिती? 

एकिकडे अंबानींवर कर्जाचा डोंगर असला तरीही दुसरीकडे मात्र शेअर बाजारात कंपनी सुस्थितीत असली तरीही मागील 6 महिन्यांचा कालावधी मात्र काहीसा तणावपूर्ण असल्याचं म्हटलं गेलं. दरम्यानच्या काळात कंपनीच्या शेअरमध्ये 12 टक्क्यांची पडझडही पाहायला मिळाली. असं असलं तरीरीही कंपनीची एकंदर आर्थिक स्थिती मात्र ढासळलेली नसून त्यामुळंच गुंतवणूकदारांना या ब्रँडमध्ये विश्वासार्हता दिसते हे स्पष्ट होत आहे.