मुंबई : जंगलात वाघ, बिबट्यांचं राज्य असतं असं म्हणतात. खरंच तसंच आहे. वाघ असो की बिबट्या यांची ताकद अफलातून असते. सोशल मीडियावर एका बिबट्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत बिबट्याने हरिणाची शिकार केलेली दिसतेय. मृत हरिणाला आपल्या जबड्यात पकडून शक्तिशाली बिबट्याने थेट उंच झाडावर नेले. विशेष म्हणजे हरिण त्या बिबट्याच्या वजनाहून अधिकचे दिसत आहे. परंतु बिबट्या त्या मृत हरिणाला जबड्यात घेऊन आरामात झाडावर चढला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रंचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओ पोस्ट करणारे वापरकर्ते @Chopsyturvey यांनी या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये 'युनिक फुटेज' असं म्हटलं आहे. 



तुम्ही पाहू शकता की, बिबट्याने आपली शिकार झाडावर आरामात नेली. हरिणाचे वजन बिबट्याच्या वजनाएवढे किंवा जास्त वाटत आहे. तरीही आपल्या जबड्यात हरिणाला घट्ट पकडून झाडावर नेणाऱ्या बिबट्याची ताकद पाहून लोक आश्चर्यचकीत होत आहेत.