जंगल सफारीदरम्यान सिंहिणीने गाडीतील प्रवाशांवर घेतली उडी...थरारक व्हिडीओमध्ये पुढे काय घडलं पाहा
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावरील यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत.
मुंबई : सोशल मीडियाच्या जगात तुम्हाला प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ पाहायला मिळाले असतील. जंगल सफारीचे अनेक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. परंतु से काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत, ज्यामध्ये वन्य प्राण्यांनी सफारीदरम्यान लोकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याचा व्हिडीओ तुम्ही पाहिला असणार. काही व्हिडीओ हे खूप धक्कादायक असतात जे पाहून आपल्याला भिती वाटते.
सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, एक सिंहिण सफारीचा आनंद घेत असलेल्या लोकांच्या गाडीत शिरली. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावरील यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. तुम्ही देखील हा व्हिडीओ पाहिल्यानंतर घाबरुन जाल आणि पुढे काय घडेलं हे जाणून घेण्यासाठी टक लावून तो व्हिडीओ पाहाल.
व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये, एक माणूस सफारीदरम्यान आपल्या मोबाईलवर सिंहिणीचा व्हिडीओ करत असतो. त्याचवेळी इतर काही लोकही कारमध्ये बसलेले दिसतात. यानंतर दिसणारे दृश्य हे घाबरवून टाकणारे आहे. सिंहिण अचानक गाडीच्या दिशेने येते आणि उडी घेऊन गाडीच्या आत शिरते. मग काय, आत बसलेल्या लोकांची अवस्था खूपच बिघडते.
परंतु लोकांवर हल्ला करण्याऐवजी सिंहनी त्यांना मिठी मारते आणि प्रेम करण्यास सुरूवात करते.
11 सेकंदांचा हा व्हिडिओ ट्विटरवर @Jamie24272184 नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. वापरकर्त्याने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, 'Oh holy hell!'
काहींना हा व्हिडीओ खूपच हास्यास्पद वाटत आहे, नंतर अनेकांना तो पाहिल्यानंतर आश्चर्य देखील वाटले आहे. एका वापरकर्त्याने हसण्याचे emoji कमेंट केली आहे, तर दुसऱ्याने कमेंटमध्ये लिहिले की, जो कोणी तिला मिठी मारण्यास नकार देईल त्याचे डोके गमावले जाईल. त्याचवेळी, तिसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली आहे, ती भुकेली नव्हती हे चांगले आहे, अन्यथा या लोकांचे काय झाले असते. त्याचवेळी, आणखी एका वापरकर्त्याने लिहिले, ही सिंहनी एका मिनिटात त्यांचं काम तमाम करू शकली असती, पण त्यांचं नशीब चांगलं होतं.